रेल्वेतून एकटीने प्रवास करणाऱ्या महिलेला सर्वात मोठी सूट

कुशीनगर येथे घडलेल्या घटनेनंतर महिलांना दिली जाणारी ही सूट पुन्हा एकदा चर्चेला आली आहे. 

Updated: May 4, 2018, 02:32 PM IST
रेल्वेतून एकटीने प्रवास करणाऱ्या महिलेला सर्वात मोठी सूट title=

मुंबई : रेल्वेत एकटीच प्रवास करणाऱ्या महिलेला रेल्वेकडून सर्वात मोठी सूट देण्यात आली आहे, ही सूट महिलांच्या सुरक्षिततेसाठी आहे. कुशीनगर येथे घडलेल्या घटनेनंतर महिलांना दिली जाणारी ही सूट पुन्हा एकदा चर्चेला आली आहे. रेल्वेतील महिला प्रवासीसाठी रेल्वे मॅन्युअल १९८९ मध्ये सुरक्षिततेसाठी हा नियम बनवण्यात आला आहे, पण याचा वापर करायला प्रवासी देखील विसरले आहेत. त्यामुळे यापुढे तुमच्या घरातील महिला किंवा ओळखीच्या महिलांना हा नियम जरूर सांगा. या कायद्यानुसार एकटी महिला जर तिच्याकडे तिकीट नसेल, काही कारणांमुळे तिकीट काढता आलं नसेल तर ती, रेल्वे प्रवास करू शकते. टीसी त्या महिलेला रेल्वेखाली उतरवू शकत नाही. रेल्वे बोर्डाने या नियमांचं सक्तीने पालन करण्याचे आदेश दिले आहेत.

का बनवला आहे असा नियम 

रेल्वेच्या नियमानुसार जर एकटी महिला रेल्वेत प्रवास करत असेल, आणि काही कारणांमुळे जर ती तिकीट काढू शकली नाही, तर तिला पुढील स्टेशनवर रेल्वेतून उतरून जा असं, टीटीई किंवा टीसी म्हणू शकत नाही. कारण रेल्वेचा प्रवास हा लांबचा असतो, आणि रात्री अपरात्री एका अनोळख्या स्टेशनवर एकट्या महिलेला उतरवलं, तर तिच्यासोबत काही दुर्देवी घटना घडली, तर किंवा  अडचणी वाढल्या तर, ती जबाबदारी रेल्वेचीही असू शकते. यासाठी रेल्वेच्या नियमानुसार एकट्या महिलेला प्रवास करू देणे आवश्यक आहे, आणि तिला इच्छीत स्थळी उतरू द्या, असंही म्हटलं आहे.

आणखी काही नियम

हेच नाही जर महिलेचं आरक्षण कोचमध्ये प्रवास करत असेल, तर तिचं सीट कन्फर्म नाही झालं, तर वेटिंग लिस्टमध्ये तिचं नाव असेल, तर महिला प्रवासीला ते कोचच्या बाहेर पाठवू शकत नाही. ती वेटिंगवर प्रवास करू शकते.  रेल्वेने महिलांना एवढी सवलत दिली आहे की, जर महिलेचं तिकीट सेकंड स्लिपरचं असेल आणि ती एसी कोचमध्ये असेल, तर टीसी फक्त त्यांना विनंती करू शकतो की, तुम्ही सेकंड स्लिपरचं तिकीट असल्याने त्या कोचमध्ये जा. जबरदस्तीने टीसी-टीटीई त्यांना कोचमधून काढू शकत नाही.