मुंबई : Mumbai University bomb threat : मुंबई विद्यापीठात (Mumbai University) बॉम्बस्फोट (bomb threat ) घडवून आणण्याची ई-मेलवरून धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे एकच गोंधळ उडाला आहे. दरम्यान, मुंबई विद्यापीठाच्या ईमेल आयडीवरून मार्च 2021च्या परीक्षेचे निकालाचे कामकाज सुरू असताना. हे धमकीचा ई-मेल आल्याचे सांगितले जात आहे.
विशेष म्हणजे धमकीत ही आरोपींनी BSC, B.com, BA, यांचे 6 सेमिस्टरचे निकाल लवकर लावले नाही तर विद्यापीठात स्फोट घडवून आणला जाईल. निकाल लागले नाही तर बॉम्बस्फोटाची चित्र पाठवून विद्यापीठ उद्धवस्त करु, अशी धमकी दिली होती.
9 जुलै आणी 10 जुलै रोजी दोन स्वतंत्र ईमेल आयडीहून ही धमकी देण्यात आली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. हा मेल पाठवणारा विद्यार्थी असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याची मानसिक स्थिती बरोबर नसल्याचे उघड झाले आहे. पुढील तपास मुंबई सायबर पोलीस करत आहेत