मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेने Brihanmumbai Municipal Corporation (BMC) कोरोनाची (Corona crisis) परिस्थिती लक्षात घेता अभय योजनेची (Abhay Yojana) मुदत ३१ डिसेंबर २०२० पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या कोरोना संकटामुळे अडचणीत असलेल्या मुंबईकरांना या निर्णयामुळे दिलासा मिळेल, असे मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे (Guardian Minister Aaditya Thackeray) यांनी सांगितले.
यासंदर्भात आमदार सुनील प्रभु यांनी पालकमंत्री आदित्य ठाकरे यांना निवेदन दिले होते. त्यानंतर पालकमंत्री ठाकरे यांच्या विनंतीनुसार मुंबई महापालिकेने अभय योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेची मुदत काल १२ ऑगस्ट रोजी संपणार होती.
मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री @AUThackeray यांच्या विनंतीनुसार @mybmc कडून पाणी बिलाच्या थकबाकीवरील २ टक्के अतिरिक्त शुल्क माफ करण्याच्या #अभय योजनेला मुदतवाढ. #COVID_19 संकटामुळे अडचणीत असलेल्या मुंबईकरांना या निर्णयामुळे दिलासा मिळेल- पालकमंत्री pic.twitter.com/x4Zu9orclP
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) August 12, 2020
मुंबई महापालिकेच्या पाणी बिलाच्या थकबाकीवर दरमहा २ टक्के अतिरिक्त शुल्क आकारले जाते. अभय योजनेअंतर्गत २ टक्के अतिरिक्त शुल्क माफ केले जाते. मुंबईकरांना आता ३१ डिसेंबर २०२० पर्यंत या योजनेचा लाभ घेता येणार आहे. मुंबईकरांना दिलासा देणाऱ्या या निर्णयाबद्दल मुंबई महापालिकेचे तसेच मुदतवाढ मिळण्यासाठी पाठपुरावा केल्याबद्दल आमदार सुनील प्रभू यांचे पालकमंत्री ठाकरे यांनी आभार मानले आहेत.