SSC-HSE Exams : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, दहावी, बारावी परीक्षेचं संभाव्य वेळापत्रक जाहीर

विदयार्थ्यांनो तयारीला लागा, परीक्षेचं संभाव्य वेळापत्रक जाहीर  

Updated: Sep 19, 2022, 09:15 PM IST
SSC-HSE Exams : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, दहावी, बारावी परीक्षेचं संभाव्य वेळापत्रक जाहीर title=

SSC-HSE Exams : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education)फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. त्यानुसार बारावीची (HSC) परीक्षा 21 फेब्रुवारीला, तर दहावीची (SSC) परीक्षा 2 मार्चला सुरू होणार आहे.

शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार बारावी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 20 मार्च 2023 या कालावधीत होणार आहे. तर दहावीची परीक्षा 2 मार्च ते 25 मार्च 2023 या कालावधीत होणार आहे. दरम्यान शिक्षण मंडळाने जाहीर केलेलं हे संभाव्य वेळापत्रक (Exam Scheduld) असून विद्यार्थ्यांना (Student) अभ्यासाचं नियोजन करता यावं यासाठी परीक्षेचं संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. निश्चित वेळापत्रकाबाबतची माहिती शाळांना दिली जाणार असून सुधारित वेळापत्रकानुसारच परीक्षा घेतल्या जाणार आहेत.

2022 या शैक्षणिक वर्षात दहावी आणि बारावाची परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेतली होती. दोन वर्ष ऑनलाईन अभ्यासक्रम झाल्यामुळे विद्यार्थ्यांचा लिखाणाचा सराव कमी झाला होता. हे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी जास्त वेळ देण्यात आला होता.

दहावी बोर्ड परीक्षेचा संभाव्य सविस्तर वेळापत्रक
2 मार्च : प्रथम भाषा ( मराठी, हिंदी उर्दू ,गुजराती व इतर प्रथम भाषा)
3 मार्च : द्वितीय वा तृतीय भाषा 
6 मार्च : इंग्रजी 
9 मार्च : हिंदी ( द्वितीय किंवा तृतीय भाषा)
11 मार्च : संस्कृत, उर्दू ,गुजराती पाली ( द्वितीय किंवा तृतीय भाषा)
13 मार्च : गणित भाग - 1
15 मार्च : गणित भाग 2
17 मार्च : विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1
20 मार्च : विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 
23 मार्च : सामाजिक शास्त्र पेपर 1
25 मार्च : सामाजिक शास्त्र पेपर 2