दीपक भातुसे / मुंबई : राज्यात देशी दारुच्या दुकानांना पार्किंग सक्तीचे करण्यात आले आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे अनेक देशी दारु दुकानं बंद होण्याची शक्यता आहे.
राज्यातील देशी दारूच्या दुकानांना यापुढे वाहनतळ सक्तीचे
- दुकानाचे वाहनतळ नसेल तर देशी दारूच्या दुकानांचे नूतनीकरण होणार नाही
, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे देशी दारुच्या दुकानांवर आता बालंट येणार आहे.
- राज्यातील देशी दारूच्या दुकानांना यापुढे वाहनतळ सक्तीचे
- दुकानाचे वाहनतळ नसेल तर देशी दारूच्या दुकानांचे नूतनीकरण होणार नाही
- राज्य उत्पादन शुल्क विभागाचा निर्णय
- वाहनतळ अकृषिक जागेत असल्याचा पुरावा द्यावा लागणार
- देशी दारूची दुकाने भरवस्तीत असल्याने होण-या वाहतुक कोंडावर उपाय म्हणून उत्पादन शुल्क विभागाचा निर्णय
- याशिवाय देशी दारूच्या दुकानांसाठी सध्याच्या १६ मीटर जागेऐवजी 25 मीटर जागा असल्याचीही नवी अट
- राज्यात ४२३० देशी दारूची दुकाने
- वाहनतळ आणि जागेच्या सक्तीमुळे द्शी दारु दुकानदारांचे धाबे दणाणले
- शहराच्या मध्यभागी असलेल्या अनेक देशी दारू दुकानांसाठी वाहनतळाची जागाच उपलब्ध नाही
- अशी दुकाने नव्या सक्तीमुळे बंद होण्याची चिन्हे