भाजपचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार उद्या राज्यपालांची भेट घेणार आहेत.

Updated: Nov 6, 2019, 07:18 PM IST
भाजपचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार title=

मुंबई : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार उद्या राज्यपालांची भेट घेणार आहेत. सरकार बनवण्याच्या प्रक्रियेबाबत चर्चा करण्यासाठी ही भेट होणार असल्याचं मुनगंटीवारांनी स्पष्ट केलं आहे. वर्षा बंगल्यावर बुधवारी पुन्हा भाजपा कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीत सत्तास्थापनेबाबत चर्चा झाली. भाजपा, शिवसेना आणि मित्रपक्षांना सत्तास्थापनेसाठी जनादेश मिळाल्याचं सांगतानाच लवकरच गोड बातमी मिळेल, असंही मुनगंटीवार म्हणालेत. त्याच वेळी नव्या प्रदेशाध्यक्षाची निवड ३१ डिसेंबरपर्यंत केली जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

दरम्यान सर्व घडामोडींच्या पार्श्वभुमीवर नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची बैठक पार पडली आहे. मुख्यमंत्रीपदाबाबत तडजोड करायची नाही असे या बैठकीत ठरल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देणार नाही आणि देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री राहतील यावर या बैठकीत निर्णय झाला.

शिवसेनेने पाठिंबा न दिल्यास राष्ट्रपती राजवट लागू करण्याची भाजपाती तयारी असल्याचे यातून स्पष्ट होत आहे. शिवेसनेने पाठिंबा दिल्याशिवाय सत्तास्थापनेचा दावा करणार नाही असेही या बैठकीत ठरल्याची माहिती समोर येत आहे.