मुंबई : हक्काच्या घरांसाठी गिरणी कामगारांनी मुंबईत आझाद मैदानात आंदोलन केलं. 29 सप्टेंबरच्या बैठकीत गिरणी कामगारांच्या घरांबाबत ठोस निर्णय न झाल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना 'वर्षा' निवासस्थानी सुखाने दिवाळी साजरी करू देणार नाही असा इशारा गिरणी कामगारांनी दिला आहे.
तर मुंबईत यशवंत सेनेच्या कार्यकर्त्यांनी धनगर आरक्षणासाठी मोर्चा काढला. पोलिसांनी या मोर्चाला सुरुवातीलाच रोखलं. अखेर रस्ताच्या बाजूनं कार्यकर्त्यांना जाण्यास पोलिसांनी परवानगी दिली. रखडलेल्या निकालांच्या पार्श्वभूमीवर युवासेनेतर्फे मुंबई विद्यापीठाच्या कालिना इथे मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि कुलगुरू डॉक्टर संजय देशमुख यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तर आर्थिक विवंचनेत सापडल्या बेस्ट व्यवस्थापन आणि पालिका प्रशासनाच्या बैठकीत कोणताही तोडागा निघालेला नसल्यानं बेस्टचे कर्मचारी साखळी उपोषणाला बसलेत. या उपोषणाचे परिणाम मुंबईकरांना भोगावे लागण्याची शक्यता आहे.