मुंबई: मुंबईतील गिरणी कामगारांच्या घरांसाठी येत्या १ मार्चला पहिली लॉटरी काढली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच ही सर्व घरे मुंबईलगतच्या परिसरात असतील, असेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर गिरणी कामगारांकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे. आतापर्यंत १२ हजार गिरणी कामगारांना राज्य शासनामार्फत घरे मिळाली होती. परंतु, आगामी काळात सर्व १ लाख ७० हजार गिरणी कामगारांना घरे देण्यात येतील.
कर्जमाफीच्या लाभार्थ्यांची पहिली यादी उद्या जाहीर होणार
सह्याद्री अतिथीगृहात गिरणी कामगारांच्या नेत्यांसोबत आज मुख्यमंत्र्यांची बैठक झाली. यावेळी मुंबई आणि परिसरात उपलब्ध असलेली ४५ हजार घरे गिरणी कामगारांना देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला. उर्वरित गिरणी कामगारांना आता राज्य सरकार एमएमआरडीए परीसरातच घरे बांधून देईल.
'भाजपने वारेमाप आरोप करू नयेत, समजुतदार विरोधी पक्षाप्रमाणे वागावे'
गिरणी कामगारांना काय मिळणार?
* १ मार्चला ३०८५ घरांसाठी सोडत निघणार, २२० चौरस फुटांचे घर मिळणार
* १ एप्रिल रोजी २२१७ घरांची सोडत निघणार, पनवेलच्या कोन गावात घरे, ३२० चौरस फुटांचे क्षेत्रफळ