Mukesh Ambani And Anand Jain : गडगंज श्रीमंत असलेले मुकेश अंबानी यांचे अतिशय जवळचे मित्र, जे अगदी लहान भावासारखे आहेत. ते म्हणजे आनंद जैन. आनंद जैन आणि मुकेश अंबानी यांच्यातील नातं इतकं घट्ट आहे की, अंबानी त्यांना आपल्या लहान भावाचा दर्जा देतात. आनंद जैन यांचा देखील एकेकाळी देशातील 40 सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये समावेश होता.
आनंद जैन हे हर्ष जैनचे वडिल होते. हर्ष ड्रीम 11 चे संस्थापक आहे. हर्ष यांची पत्नी रचना ही डेंटिस्ट असून दोघांचं 2013मध्ये लग्न झालं आहे. या दोघांनी मुंबईतील सर्वात आलिशान घरांपैकी एख आहे. या घराशेजीर डुप्लेक्स अपार्टमेंट खरेदी केलंय. महत्त्वाचं म्हणजे या घराची किंमत तब्बल 72 कोटी रुपये आहे. अँटिलिया या आलिशान घराची किंमत 15000 कोटी रुपये इतकी आहे.
मुकेश अंबानी यांचा भाऊ अनिल यांच्याबद्दल लोकांना माहिती आहे. त्याचबरोबर मुकेश अंबानी यांचा 'दुसरा भाऊ' आनंद जैन आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. उद्योगपती आनंद जैन हे मुकेश अंबानींच्या भावासारखे मानले जातात. शालेय जीवनापासून सुरू झालेल्या दोघांमध्ये दशकापूर्वीची मैत्री आहे. 2007 मध्ये फोर्ब्सच्या भारतातील 40 श्रीमंतांच्या यादीत आनंद जैन 11 व्या क्रमांकावर होते.
मुकेश अंबानी आणि त्यांचे कुटुंब भारतातील सर्वात महागड्या घरात अँटिलियामध्ये राहतात. त्याची किंमत 15000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. अँटिलियाजवळचा परिसर हा भारतातील सर्वात महागड्या भागांपैकी एक मानला जातो. हर्ष जैन यांच्या पत्नीने तेथे 72 कोटी रुपयांचे डुप्लेक्स अपार्टमेंट खरेदी केले आहे. रचना जैन या हर्ष जैन यांच्या पत्नी आहेत. या जोडप्याचे नवीन घर 29व्या आणि 30व्या मजल्यावर आहे. रचना जैन या डेंटिस्ट आहेत. या जोडप्याने 2013 मध्ये लग्न केले. दोघांना एक मुलगा क्रिश आहे. हर्ष जैन 65,000 कोटी रुपयांची ड्रीम11 कंपनी स्थापन करण्यासाठी पत्नीच्या पाठिंब्याबद्दल उघडपणे बोलतात. त्याच्या यशामागे रचना ही अदृश्य शक्ती असल्याचे देखील हर्ष जैन यांनी एका ट्विटमध्ये म्हटले होते. संस्थापकाच्या यशाचे श्रेय कुटुंबाला कधीच मिळत नाही, असे हर्ष यांचे मत आहे. त्यामुळे ते आवर्जून आपल्या पत्नीचे कौतुक करताना दिसतात.