Mumbai News : आज ख्रिसमसच्या दिवशी घराबाहेर पडणार असाल तर ही बातमी वाचा!

Mega Block : आज ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी तुम्हीही घराबाहे पडणार असाल तर लोकलचे वेळापत्रक नक्की चेक करा. आज 25 डिसेंबरला मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक आहे.  

Updated: Dec 25, 2022, 08:13 AM IST
Mumbai News  : आज ख्रिसमसच्या दिवशी घराबाहेर पडणार असाल तर ही बातमी वाचा!  title=

Mumbai Railway Mega block  : आज (Christmas 2022) ख्रिसमस साजरा करण्याचा दिवस. त्यातही रविवार (Sunday) हा सुट्टीचा दिवस असल्यामुळे  अनेकजण बाहेर फिरण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण, ऐन नाताळच्या दिवशी मुंबईकरांपुढे संकट असेल ते म्हणजे मेगा ब्लॉकचं. (Mega block on the day of Christmas at Mumbai local western and central line latest Marathi news )

रविवारी मेगाब्लॉक 

रेल्वेच्या यांत्रिकी कामांसाठी  रविवारी (sumday Christmas 2022 ) मध्य रेल्वेवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते विद्याविहारदरम्यान दोन्ही धिम्या मार्गावर 10.55 ते दुपारी 3.55 वाजेपर्यंत आणि उपनगरीय मार्गावर वडाळा रोड ते मानखुर्द स्थानकांदरम्यान दोन्ही मार्गांवर सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंक मेगाब्लॉक असेल. ज्यामुळं मुंबईकरांच्या प्रवासात अडथळा येऊ शकतो.  पश्चिम रेल्वेवर दिवसकालीन मेगाब्लॉक नसणार. असं असलं तरीही लोकल रेल्वे वेळापत्रकानुसारच धावतील. मेगाब्लॉकमुळे (Mega Block) सीएसएमटी आणि घाटकोपरदरम्यान धिम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर चालवण्यात येतील. या दोन स्थानकांदरम्यान भायखळा, परेल, दादर, माटुंगा, शीव, कुर्ला स्थानकांवर लोकल थांबतील. 

हार्बर मार्गावर मेगाब्लॉक (Megablock on Harbor Line)

  • वडाळा रोड-मानखुर्द अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.00 ते दुपारी 4.00 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. 
  • सीएसएमटी-वांद्रे/गोरेगाव रेल्वे मार्गावर कोणत्याही सेवेवर परिणाम होणार नाही.
  • सकाळी 9.40 ते दुपारी 3.28 पर्यंत पनवेल/बेलापूर/वाशीहून सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून सकाळी 10.03 ते दुपारी 3.54 वाजेपर्यंत पनवेल/बेलापूर/वाशीकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
  • ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते वांद्रे/गोरेगाव दरम्यानच्या उपनगरीय रेल्वे सेवा वेळापत्रकानुसार धावतील.
  • हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी 10.00 ते दुपारी 4.30 या वेळेत ट्रान्स हार्बर/मुख्य मार्गावरून प्रवास करण्याची परवानगी आहे.
  • मेगा ब्लॉक कालावधीत पनवेल-मानखुर्द मार्गावर विशेष उपनगरीय गाड्या धावतील.

(Corona) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांनी गर्दी टाळा 

दरम्यान, रेल्वेचा मेगा ब्लॉक पाहता तुम्ही जर ही गर्दी टाळण्याचा विचार करत असाल तर तो तुमच्यासाठीच फायद्याचा ठरू शकतो. कारण, चीनमध्ये आलेल्या कोरोनाच्या (Corona Virus) लाटेचे पडसाद मभारतात आणि इथं मुंबईतही पडताना दिसत आहेत. प्रशासनानं दिलेल्या इशाऱ्यानुसार गर्दीच्या ठिकाणी असताना मास्कचा वापर करणं, कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करणं आणि तत्सम सर्व गोष्टींची काळजी घेण्याचं आवाहन मुंबईकरांना आणि इतरही सर्वांनाच करण्यात येत आहे.  त्यामुळं सुट्टीच्या दिवशी तुम्हीही एखाद्या गर्दीच्या ठिकाणी प्रवास करणार असाल, रेल्वेनं ये-जा करणार असाल तर मास्कचा वापर नक्की करा. अन्यथा मुंबईत पुन्हा लोकल बंद होण्याची वेळ येईल असा दिवस दूर नसेल.