मुंबई : अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी तब्बल ८४ दिवसांनंतर मध्य रेल्वे १५ जून रोजी धावली. आता १३ दिवसांनंतर रेल्वेचा मेगा ब्लॉक रविवारी २८ जून रोजी असणार आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी ही अत्यंत महत्वाची बातमी आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आपलं आयकार्ड दाखवून यावेळी प्रवास करत आहेत. सामान्यांसाठी रेल्वेने प्रवास करण्यास मनाई करण्यात आली आहे.
रविवार विविध अभियांत्रिकी व देखभाल कामांसाठी मध्य रेल्वे मुंबई विभाग आपल्या उपनगरी भागांवर मेगा ब्लॉक संचालीत करणार आहे. या मार्गांवर अशा पद्धतीने मेगाब्लॉक करत आहे.