Mumbai University Walk in interview: चांगल्या पगाराची नोकरी शोधणाऱ्यांसाठी महत्वाची अपडेट आहे. मुंबई विद्यापीठाअंतर्गत वॉक इन इंटर्व्ह्यूची प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. थेट मुलाखतीतून ही निवड होणार असून उमेदवारांना त्याची माहिती देण्यात आली आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
मुंबई विद्यापीठाअंतर्गत इंजिनीअरची एकूण 8 रिक्त पदे भरली जाणार आहेत. ज्युनिअर इंजिनीअर सिव्हिलची 6 पदे भरली जाणार आहेत. तर ज्युनिअर इंजिनीअर इलेक्ट्रीकलची 2 रिक्त पदे भरली जातील. ज्युनिअर इंजिनीअर सिव्हिल पदासाठी मुलाखत देणाऱ्या उमेदवाराकडे संबधित क्षेत्रातील किमान 3 वर्षांची पदवी असणे आवश्यक आहे. तसेच या क्षेत्रातील किमान 1 वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे. ज्युनिअर इलेक्ट्रिकल इंजिनियनरिंग पदासाठी यातील किमान 3 वर्षांची पदवी असलेला उमेदवार अर्ज करु शकतो. तसेच इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग क्षेत्रातील पदवी असलेले आणि संबंधित कामाचा 1 वर्षांचा अनुभव असलेले उमेदवारदेखील अर्ज करु शकतात.
ज्युनिअर इंजिनीअर सिव्हिल आणि ज्युनिअर इलेक्ट्रिकल इंजिनियनरिंग पदासाठी उमेदवारांची निवड थेट मुलाखतीच्या माध्यमातून होणार आहे. यासाठी उमेदवारांना थेट मुलाखतीला उपस्थित रहावे लागणार आहे.
मुंबई विद्यापीठातील रिक्त पदांच्या भरतीसाठी होणाऱ्या मुलाखतीला तुम्ही जाताय? मग काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील. नोकरीचा अर्ज तुम्हाला सोबत न्यावा लागेल. त्या अर्जामध्ये तुम्ही स्वत:बद्दल लिहिलेली माहिती अचूक आहे का? आवश्यक कागदपत्रे आपल्या सोबत आहेत का? हे नक्की पाहा.
मुंबई विद्यापीठातील रिक्त पदांच्या भरतीसाठी होणारी मुलाखत 8 जुलै 2024 रोजी होणार आहे. मुंबई विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सभागृह,डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, तिसरा मजला, विद्यानगरी, सांताक्रूझ (पूर्व] मुंबई,98 या पत्त्यावर ही मुलाखत होईल.सकाळी 10 वाजता ही मुलाखत होणार असून उमेदवारांनी वेळेच्या अर्धा तासआधी उपस्थित राहणे आवश्यक आहे. दिलेल्या वेळेनंतर आलेल्या उमेदवारांचा मुलाखतीसाठी विचार केला जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्या.
मुंबई विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा