Sachin Tendulkar Bandra House: भारताचा माजी क्रिकेटपट्टू सचिन तेंडुलकर निवृत्तीनंतरही लोकांच्या मनात घर करुन आहे. क्रिकेटचा देव समजल्या जाणाऱ्या सचिन आणि त्याचा खेळ कोणी विसरु शकत नाही. दरम्यान सचिन सध्या एका वेगळ्या कारणाने चर्चेत आहे. सचिनच्या घराबाहेरुन मोठ मोठ्याने आवाज येत असल्याची तक्रार समोर आलीय. सचिनच्या घराशेजारी राहणाऱ्या एका नागरिकाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन त्याची कैफीयत मांडली नाही. या पोस्टमध्ये सचिनचे नाव असल्याने खूप चर्चा सुरु आहे. काय आहे हा प्रकार जाणून घेऊया.
सचिन तेंडुलकर आपल्या कुटुंबासह मुंबईतील वांद्रे येथे राहतो. त्याच्या शेजारी राहत असलेल्या दिलीप डिसोझा यांनी त्यांच्या एक्सवर तक्रारीचा पाढा वाचून दाखवला आहे. त्यांनी रविवारी आपल्या एक्स अकाऊंटवरुन एक पोस्ट केली. त्यात सचिनच्या घराबाहेरुन मोठ मोठ्याने आवाज येत असल्याचा दावा केला.
सचिन तेंडुलकरच्या घराचे बांधकाम सुरु आहे. या कामासाठी सिमेंट मिक्सरचा वापर होतो. त्यातून मोठा आवाज येत असल्याच दावा करण्यात आला आहे. सचिनचे नाव असल्याने दिलीप यांची ही पोस्ट व्हायरल झाली, लोक आपापल्या परिने कमेंटचा वर्षाव देखील करत आहेत. विशेष म्हणजे दिलीप यांनी या पोस्टमध्ये मुंबई पोलीस किंवा पालिकेला टॅग करणे अपेक्षित होते. पण त्यांनी तसं केलेलं दिसत नाही. त्यांनी थेट मास्टर ब्लास्टरला यात मेन्शन केलंय.
Dear @sachin_rt, it's nearly 9pm and the cement mixer that's been outside your Bandra home all day making a loud noise is still there, still making a loud noise.
Please could you ask the people working on your home to stick to reasonable hours? Thank you so much.— Dilip D'Souza (@DeathEndsFun) May 5, 2024
प्रिय सचिन तेंडुलकर, आता रात्रीचे जवळपास 9 वाजले आहेत आणि दिवसभर तुमच्या वांद्र्याच्या घराबाहेर मोठा आवाज करत असलेला सिमेंट मिक्सर अजूनही सुरु आहे, असे सांगत कृपया तुमच्या काम करणाऱ्या लोकांना योग्य वेळी काम करण्यास सांगाल का?’ असा प्रश्नवजा सूचना त्यांनी सचिनला केली आहे.
सचिन तेंडुलकरने या वर्षाच्या सुरुवातीला विस्तीर्ण दोराब व्हिला विकत घेतल्याचे वृत्त समोर आले होते. आता या ठिकाणी बहुमजली घर बांधण्यात येणार आहे. त्यासाठी सध्याची रचना तोडणे आवश्यक होते. त्यासाठी दोन महिन्यांपासून कामाला सुरुवात झाली आहे. शेजारच्यांना त्रास होऊ नये याची खबरदारी सचिनने आधीच घेतली होती. वांद्रे येथील भूखंडावर आपण घर बांधत आहोत. यादरम्यान होणाऱ्या गैरसोयीबद्दल आपण दिलगीर असल्याचे त्याने या पत्रात लिहिले होते. त्याने आपण करत असलेल्या कामाची माहिती दिली होती. पण दिलीप यांना कामाच्या वेळेबद्दल आक्षेप आहे. रात्रीच्या वेळेत हे काम होऊ नये, हे त्यांना अपेक्षित आहे. आजुबाजूला राहणाऱ्या साधारण 100 कुटुंबांना हे पत्र पाठवण्यात आले. पण काम करणाऱ्यांनी कामाच्या वेळा पाळाव्या असे शेजाऱ्यांचे म्हणणे आहे.