मुंबई : मुंबईच्या लसीकरण केंद्रांवर आज लसीकरण बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लसीकरण केंद्रे बंद करण्याची घोषणा शनिवारीच पालिकेने केली. तसेच सोमवारी केंद्रे उघडण्याबाबतची माहिती रविवारी ट्विटद्वारे दिली जाईल असेही सांगण्यात आले. बीएमसीचे अतिरिक्त आयुक्त (BMC Additional Commissioner)सुरेश काकाणी यांनी स्पष्टीकरण दिले आहे की लसीची कमतरता असल्यामुळे लसीकरण केंद्रे बंद करण्यात आली नसून रविवार असल्यामुळे लसीकरण बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Dear Mumbaikars. There will be no vaccination at any of the centres tomorrow. Hope you all have a wonderful Sunday. The details for Monday will be shared tomorrow by this handle & the respective wards too. #MyBMCVaccinationUpdate
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) May 22, 2021
पलिकेने ट्विट करत सांगितलं की, 'मुंबईकर... लसीकरण केंद्रांवर आज लसीकरण बंद राहतील. तुमचा रविवार आनंददायी जावो. सोमवारच्या लसीकरणाबाबत माहिती रविवारी देण्यात येईल.' आज रविवार असल्यामुळे लसीकरण बंद करण्यात आलं आहे.
महाराष्ट्रात शनिवारी 26 हजार 133 नव्या कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली. तर 682 रूग्णांचा कोरोनामुळे जीव गेला आहे. आरोग्य विभागाने जारी केलेल्या बुलेटिननुसार आतापर्यंत राज्यात 55,53,225 लोकांना कोरोनाची कोरोना व्हायरसची लागण झाली असून 87 हजार 300 रूग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे.