मुंबई : शहरात आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उद्या मुंबईसह राज्यातल्या काही भागासाठी ऑरेंग्ज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईत आज जोरदार वाऱ्यांसह काही ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो, असा अंदाज आहे.
मुंबईमध्ये आज पावसाचा यलो अलर्ट । तर उद्या मुंबईसह राज्यातल्या काही भागासाठी ऑरेंज अलर्ट । विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा अंदाज#rain @ashish_jadhao https://t.co/kpo9phDaSR pic.twitter.com/Us1wNWue8Z
— ZEE २४ तास (@zee24taasnews) October 14, 2020
तर गुरुवारी मुंबई, पालघर, ठाणे, रायगड आणि रत्नागिरीमध्ये जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान विभागाने हा इशारा दिला आहे. बंगालच्या खाड़ीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
कोकणसह महाराष्ट्रातील अनेक भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे. काल संध्याकाळी मुंबईसह नवी मुंबई, कोकण याठिकाणी जोरदाप पाऊस झाला. यावेळी ढगांचा गडगडासह विजांचा कडकडाट पाहायला मिळाला.
हवामान विभागाने पुणे शहर आणि जिल्ह्याच्या परिसरात येत्या शनिवारपर्यंत अतिवृष्टी होण्याचा इशारा दिला आहे. पुणे जिल्हा प्रशासनाने अतिवृष्टी होणाऱ्या संभाव्य भागातील नागरिकांना धोक्याचा इशारा दिला आहे. अतिवृष्टी झाल्यास नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले असून, आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत.