गोळाबेरीज सिनेमात म्हैसने केला घोळ

क्षितिज झारापकर दिग्दर्शित गोळाबेरीज सिनेमा १० फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. मात्र हा सिनेमा रिलीज होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. कारण पुलंच्या गाजलेल्या म्हैस कथेचे हक्क आपल्याकडे असल्याचा दावा दिग्दर्शक शेखर नाईक यांनी केला होता.

Updated: Feb 8, 2012, 11:43 PM IST

www.24taas.com, पुणे

क्षितिज झारापकर दिग्दर्शित गोळाबेरीज सिनेमा १० फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. मात्र हा सिनेमा रिलीज होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. कारण पुलंच्या गाजलेल्या म्हैस कथेचे हक्क आपल्याकडे असल्याचा दावा दिग्दर्शक शेखर नाईक यांनी केला होता.

त्यामुळे गोळाबेरीजमधून म्हैसचा मुद्दा वगळण्यात यावा यासाठी शेखर नाईक यांनी पुण्याच्या जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली. म्हैसचा मुद्दा वगळण्यास क्षितिज झारापकर यांनी नकार दिला होता. मात्र पुलंच्या साहित्यावरून वाद नको.

असं म्हणत १० फेब्रुवारीला रिलीज होणाऱ्या सिनेमावर कोणताही परिणाम नको म्हणून शुक्रवारी रिलीज होणाऱ्या गोळाबेरीज या सिनेमातून 'म्हैस' कथेचा उल्लेख वगळ्यात आल्याचं दिग्दर्शक क्षितीज झारापकर यांनी सांगितलं. गुरुवारी न्यायालयाचा निर्णय येण्याची शक्यता आहे असं सांगून ही केस आम्ही लढणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.