अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा देणार असल्याचं मुस्लिम संघटनांनी जाहीर केला आहे. काँग्रेसनं अण्णांच्या आंदोलनाला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न केला असला तरी काँग्रेसच्या भूलथापांनी भुलणार नाही आणि अण्णांच्या आंदोलनालाच पाठिंबा देऊ, अशी ग्वाही मुस्लीम संघटनांनी दिली आहे.
अण्णांच्या आंदोलनाला जास्तीत जास्त पाठिंबा मिळावा, यासाठी अण्णांचे सहकारी अरविंद केजरीवाल यांनी क्रॉफर्ड मार्केटमध्ये काही मुस्लिम संघटनांचे प्रतिनिधी आणि NGO च्या सदस्यांची भेट घेतली. या सगळ्यांनी अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा द्यावा, यासंदर्भात केजरीवाल यांनी चर्चा केली.