लाकडी पुलाने घेतले ३१ बळी

पश्चिम बंगालमधील दार्जिलिंगपासून २६ किमी अंतरावर असलेल्या बिजनबाडी येथील नदीवरील लाकडी पूल शनिवारी रात्री कोसळल्याने ३१ जणांचा मृत्यू झाला, तर १००हून अधिक जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

Updated: Nov 5, 2011, 01:24 PM IST

झी २४ तास वेब टीम, कोलकाता 

 

पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग  जवळील बिजनबाडी येथील नदीवरील लाकडी पूल शनिवारी रात्री कोसळल्याने ३१ जणांचा मृत्यू  झाला, तर १००हून अधिक जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

 

बिजनबाडी येथील रंगीत नदीवर हा लाकडी पूल होता. या दुर्घटनेत अनेक लोक जखमी झाले  आहेत. या नदीच्या एका बाजूला शिलान्यास महाविद्यालयाचा सांस्कृतिक कार्यक्रम सुरु होता, तर दुसरीकडे जत्रा भरली होती. सांस्कृतिक कार्यक्रमात गोरखा जनमुक्ति मोर्चाचे नेते बिमल गुरुंग आणि रोशन गिरी यांची भाषणे सुरु होती. या दोघांचे भाषण ऐकण्यासाठी दीडशेहून अधिक लोक पूलावर थांबले होते. लाकडी पूलाला एवढे वजन न झेपल्यामुळे पूल १०० फूट नदीत कोसळला.

 

हा पूल १९७२ मध्ये बांधण्यात आला होता. या दुर्घटनेत अनेक लोक वाहून गेले, त्यांचा शोध घेण्यात आला. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आज घटनास्थळी भेट देणार आहेत. ममता बॅनर्जी यांनी मृतांच्या नातेवाईकांना मदत देण्याचे आणि जखमींचा उपचाराचा खर्च सरकार करणार असल्याचे म्हटले आहे.