वर्ध्याच्या कलामहोत्सवात गीतगायन

वर्धा कला महोत्सवातील गीतगायन स्पर्धेत प्रथम मराठी फिल्मी गीत तसेच सुफी संगीत वा फिल्मी नॉन फिल्मी वा भक्तीगीत यापैकी एक तसेच परीक्षकांच्या निवडीचे एक गीत गायकांनी सुरेल आवाजात सादर केले.

Updated: Dec 16, 2011, 01:04 PM IST

झी २४ तास वेब टीम, वर्धा

 

'फुलले रे क्षण माझे..' सारख्या गोड गाण्यांपासून ते  'अलबेला सजन आयो रे' सारख्या रागदारी गायनापर्यंत मराठी-हिंदी प्रेमगीताच्या सादरीकरणाने रसिकांना मंत्रमुग्ध केलं. औचित्य होते वर्धा कला महोत्सवातील गीतगायन स्पर्धेचे!यात प्रथम मराठी फिल्मी गीत तसेच सुफी संगीत वा फिल्मी नॉन फिल्मी वा भक्तीगीत यापैकी एक तसेच परीक्षकांच्या निवडीचे एक गीत गायकांनी सुरेल आवाजात सादर केले.

 

श्री. दादाजी धुनिवाले देवस्थान, माध्यम कला मंच व सामाजिक संस्था वर्धा द्वारे आयोजित वर्धा कला महोत्सवात गीतगायन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत अमरावती, वर्धा, नागपूर, काटोल, यवतमाळ, हिंगणघाट, आर्वी, वर्धा आदी ठिकाणाहून स्पर्धकांनी उस्फुर्त सहभाग घेतला. अध्यक्षस्थानी बाबासाहेब वानखेडे तर उद्घाटक म्हणून सुरेश चौधरी उपस्थित होते.

 

स्पर्धेचे परीक्षण कल्पना चौधरी, विजय शर्मा, किशोर अगडे यांनी केले.  संचालन ज्योती भगत यांनी केले तर आभार मंगेश नान्हे यांनी केले.