इतिहास दहशतवादी कारवायांचा...

गेल्या एका दशकात फक्त महाराष्ट्रात १४ दहशतवादी हल्ले झाले. त्यामुळे आपण किती सुरक्षित आहोत? असा प्रश्न नेहमीच नागरिकांना सतावत असतो. एक नजर टाकूया गेल्या दहा वर्षांमधल्या दहशतवादी कारवायांवर...

Updated: Aug 5, 2012, 04:19 PM IST

www.24taas.com, मुंबई

गेल्या एका दशकात फक्त महाराष्ट्रात १४ दहशतवादी हल्ले झाले. त्यामुळे आपण किती सुरक्षित आहोत? असा प्रश्न नेहमीच नागरिकांना सतावत असतो. एक नजर टाकूया गेल्या दहा वर्षांमधल्या दहशतवादी कारवायांवर...

* २ डिसेंबर, २००२  - मुंबईतल्या घाटकोपर इथं बेस्ट बसमध्ये बॉम्बस्फोट : २ ठार, ४९ जखमी.

 

* ६ डिसेंबर २००२ - मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनमध्ये बॉम्बस्फोट : २२ जखमी

 

* २७ जानेवारी २००३ - मुंबईतल्या विलेपार्ले रेल्वे स्टेशनमध्ये  बॉम्बस्फोट : ३० जखमी

 

* १३ मार्च २००३ - मुलुंडजवळ ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट : १३ ठार, ८० जखमी

 

* २९ जुलै २००३ - मुंबईतल्या घाटकोपरमध्ये बसमध्ये बॉम्बस्फोट : ३ ठार, ३० जखमी

 

* २५ ऑगस्ट २००३  - झवेरी बाजार आणि गेटवे ऑफ इंडियाजवळ बॉम्बस्फोट : ५५ ठार, १५० जखमी

 

* ३ मे २००६ - घाटकोपरमधील बॉम्बस्फोटात एक ठार

 

* ११ जुलै २००६ - लोकल ट्रेनमधील साखळी बॉम्बस्फोटांनी संपूर्ण मुंबई हादरली :  १८९ ठार, १००० हून अधिक जखमी

 

* ८ सप्टेंबर २००६  - नाशिकमधल्या मालेगावात तीन बॉम्बस्फोट : ३१ ठार, ३१२ जखमी

 

* २९ सप्टेंबर २००८ - मालेगावातील भिकू चौकात बॉम्बस्फोट : ६  ठार, १०१ जखमी

 

* २६ नोव्हेंबर २००८  - मुंबईवर दहशतवादी हल्ला : १६६ जणांचा मृत्यू, ३०० जखमी

 

* १२ फेब्रुवारी २०१० -  पुण्यातील जर्मन बेकरीत बॉम्बस्फोट : १७ ठार, ५४ जखमी

 

* १३ जुलै २०११ -  झवेरी बाजारासह तीन ठिकाणी बॉम्बस्फोट : २१ ठार, १४० जखमी

 

.