सातारा जिल्हा बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व सरव्यवस्थापक यांच्याकडे कामासंदर्भात चौकशी करण्यासाठी बॅंकेत गेलो होतो. त्या वेळी माझ्या हातून कोणतीही घटना घडलेली नसताना खोट्या घटनेत गुंतवून बदनामी करण्याचे षडयंत्र काही झारीतील शुक्रचार्यांनी रचले आहे, असे खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे. या घटनेतील खरी माहिती योग्य वेळी जनतेसमोर येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे यांनी सातारा जिल्हा सहकारी बँकेच्या सीईओला मारहाण केली. नोकरीची आॅडर काढण्यासाठी बँकेच्या अधिका-यांना दमदाटी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यानंतर केलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
लोकशाही मार्गाने बॅंकेत निवडून दिल्याने येणाऱ्या अडीअडचणी सोडविणे आमचे कर्तव्य आहे. बॅंकेच्या बैठकीदरम्यान कामांच्या पाठपुराव्याची माहिती घेण्यासाठी बॅंकेत गेलो होतो. मुख्य कार्यकारी अधिकारी व सरव्यवस्थापक यांच्याकडे कामासंदर्भात चौकशी केली. त्यांच्या उत्तराने समाधान न झाल्याने त्यांना आमच्या कामात लक्ष देऊन काम करण्याची सूचना केली. तेथील काम संपल्यानंतर आपण आपल्या कामासाठी निघून गेलो. त्यानंतर सुमारे चार ते पाच तासांच्या अवधीत आपल्या विरोधात षडयंत्र रचले गेले, याचे आश्चर्य वाटते, असे उदयनराजे म्हणाले.