www.24taas.com, पिंपरी - चिंचवड
पिंपरी चिंचवड परिसरातील महाळुंगे पाडाळे या गावातील एक अंध व्यक्ती समवेत ६० नागरिकांची एका भामट्यांनी लिलाव भिशीच्या माध्यमातून तब्बल अडीच कोटी रुपयांनी फसवणूक केल्याच्या धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा भामटा एका पोलिसाचा भाऊ असल्यामूळे या नागरिकांची पोलीस साधी तक्रार दाखल करून घेत नसल्याची व्यथा या नागरिकांनी व्यक्त केली आहे.
दशरथ भिमाजी पाडाळे या अंध व्यक्तीची निखील घाटकर या भामट्यांनी सहा गुंठे जमीनीच साठेखत करून फसवणूक केल्याच समोर आला आहे. एवढच नव्हे तर या गावातील ६० नागरिकांची लिलाव तब्बल अडीच कोटी रुपयांनी गंडवल्यामूळ एकच खळबळ उडाली आहे. या संदर्भात या नागरिकांनी हिंजेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले असता हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेचं असल्याच कारण सांगत या नागरिकाची तक्रार घेतली नसल्याचं या नागरीकांच म्हणणं आहे.
निखील घाटकर यान दशरथ पाडाळे या अंध व्यक्तीला आता जमीन आपल्या नावी करून देण्यासाठी धमकावत असल्याच तसंच हा भामटा पुणे पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या पोलिसाचा भाऊ असल्याच या नागरिकांचं म्हणणं आहे.
हा सर्व फसवणुकीचा प्रकार या निखील घाटकरच्या अंगलट आल्यामुळ त्याला गायब करून पोलिसांनी आश्रय दिल्याचा संताप या नागरिकांनी व्यक्त केला आहे. पिंपरी चिंचवड आणि हिंजेवाडी परिसरात अशा अनधिकृत भिशा चालाविणाऱ्यांचे खूप मोठ जाळं पसरलं आहे. त्यामुळं या नागरिकांच्या मागणीकड कोणी लक्ष घालून न्याय देतील काय? हाच खरा प्रश्न निर्माण झाला आहे.