विम्बल्डन: राफाएल नादालचं आव्हान संपुष्टात

विम्बल्डन २०१२ मध्ये आत्तापर्यंतचा सर्वात धक्कादायक निकाल लागलाय. अकरा वेळा ग्रँड स्लॅम जिंकलेल्या राफाएल नादालचा चेकच्या लुकास रसोलने ६-७, ६-४, ६-४, २-६, ६-४ असा पराभव केलाय.

Updated: Jun 29, 2012, 08:29 AM IST

www.24taas.com, विम्बल्डन, इंग्लंड

 

विम्बल्डन २०१२ मध्ये आत्तापर्यंतचा सर्वात धक्कादायक निकाल लागलाय. अकरा वेळा ग्रँड स्लॅम जिंकलेल्या राफाएल नादालचा चेकच्या लुकास रसोलने ६-७, ६-४, ६-४, २-६, ६-४ असा पराभव केलाय.

 

यामुळे नुकतीच फ्रेंच ओपन जिंकलेल्या नादालचं विम्बल्डनमधलं आव्हान संपुष्टात आलंय. तर वर्ल्ड रँकिंगमध्ये शंभराव्या  नंबरवर असलेल्या लुकाससाठी हा विजय फार महत्त्वाचा ठरलाय. २६ वर्षीय लुकासने  ३ तास १९ मिनिटं चाललेल्या गेममध्ये नादालचा पराभव केलाय.

 

.