कराचीत मैदानाबाहेर आफ्रिदीची 'फटकेबाजी'

पाकिस्तीनचा फिरकी खेळाडू शाहिद आफ्रीदीने मैदानाबाहेर 'फटकेबाजी' केल्याने क्रिकेट वर्तुळात नाराजी व्यक्त होत आहे. शाहिदने कराचीत त्याच्या चाहत्यांना मारहाण केल्याची घटना घडली. त्यामुळे आफ्रिदीवर जोरदार टीका होत आहे.

Updated: Mar 24, 2012, 11:46 AM IST


www.24taas.com,  कराची

 

 

पाकिस्तानचा फिरकी ३२ वर्षीय अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीने  मैदानाबाहेर  'फटकेबाजी' केल्याने क्रिकेट वर्तुळात नाराजी व्यक्त होत आहे. शाहिदने कराचीत  त्याच्या चाहत्यांना मारहाण केल्याची घटना घडली. त्यामुळे आफ्रिदीवर जोरदार टीका होत  आहे. दरम्यान, आफ्रिदीने चाहत्यांची जाहीर माफी मागितली आहे.

 

 

आशिया कप जिंकल्यानंतर शाहीद आफ्रिदी मायदेशी परतला असताना कराची एअरपोर्टवर त्यानं चाहत्यांना मारहाण केली. शाहीदचा ऑटोग्राफ घेण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती. गर्दीतील लोकांनी शाहीदला धक्का दिल्यामुळे शाहीद भडकल्याचं सांगण्यात येत आहे. या कारणावरून आफ्रिदीचा संयम सुटला आणि त्यांने चाहत्यावर हात उचला.  दरम्यान, शाहिदच्या मुलीला धक्का लागल्याने ती जखमी झाली. त्यामुळे शाहिदचा संशय सुटल्याचे सांगण्यात येत आहे.

 

 

बांग्लादेशला हरवून पाकिस्ताने आशिया कप जिंकल्यानंतर पाकिस्तानमध्ये जोरदार जल्लोष करण्यात आला. काहींनी मोटारीतून हवेत गोळ्या झाडून आनंद व्यक्त केला. पाक खेळाडूंचे स्वागत करण्यासाठी कराची विमानतळावर एकच गर्दी झाली होती. चाहत्यांना आवरणे सुरक्षा जवानांना हाताबाहेर गेले. त्यामुळे आफ्रिदीला धक्का बसला. मात्र, शाहिदने मारहाण केल्याने आनंदाला गालबोट लागले आहे.

 

व्हिडिओ पाहा...

आफ्रिदीची फॅन्सबरोबर हाणामारी

[jwplayer mediaid="71103"]