सर्वसामान्यांना ताटकळत ठेवणारे आणि चिरीमिरीशिवाय कामच न करण्यासाठी कुख्यात असलेल्या अंधेरीतील प्रादेशिक परिवहन कार्यालयाने चक्क ‘बिफोर टाइम’ काम केलं. पण ते तुमच्या आमच्यासाठी नव्हे, तर सचिन तेंडुलकरसाठी!
सचिनने त्याच्या ड्रायव्हिंग लायसन्सचे स्मार्ट कार्ड बनवून घेतलं त्यासाठी गर्दीची वेळ टाळून तो सकाळीच साडेनऊ वाजता ‘आरटीओ’त पोहोचला. विशेष म्हणजे क्रिकेटच्या या देवासाठी ‘आरटीओ’सुद्धा तब्बल दोन तास आधीच म्हणजे साडेआठ वाजल्यापासूनच उघडण्यात आलं होतं. सचिनने आपल्या नव्या फेरारीचा करही भरला.