गर्भलिंग निदान करणारा डॉ. भोपळे मोकाट

औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूरमध्ये गर्भलिंग निदान चाचणी करणा-या डॉ. सुभाष भोपळेचा स्टिंग ऑपरेशनद्वारे झी २४ तासनं पर्दाफाश केल्यानंतरही त्याला अद्याप अटक झालेली नाही. त्यामुळे डॉ. भोपळेवर कुणाचा राजकीय वरदहस्त तर नाही ना असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Aug 24, 2012, 10:37 AM IST

www.24taas.com,औरंगाबाद
औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूरमध्ये गर्भलिंग निदान चाचणी करणा-या डॉ. सुभाष भोपळेचा स्टिंग ऑपरेशनद्वारे झी २४ तासनं पर्दाफाश केल्यानंतरही त्याला अद्याप अटक झालेली नाही. त्यामुळे डॉ. भोपळेवर कुणाचा राजकीय वरदहस्त तर नाही ना असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय.
`लेक लाडकी` अभियानांतर्गत वर्षा देशपांडेंच्या सहकार्याने हा पर्दाफाश करण्यात आला. सुभाष भोपळे या डॉक्टरनं दहा हजार रुपये घेऊन लिंगनिदान केल्याचं उघड झालंय. भोपळे हा शिवसेनेच्या माजी नगरसेविका आणि महिला आघाडीच्या तालुका संघटक सुलभा भोपळे यांचा पती आहे.
डॉ. भोपळेकडे मोबाईल सोनोग्राफी मशीनही आढळली आहे. मोबाईल सोनोग्राफी मशीन वापरायला राज्यात बंदी असतानाही मे महिन्यात परवान्याचे नुतनीकरण झाले होते. त्यामुळे आरोग्यअधिका-यांचा डॉ. भोपळेवर वरदहस्त आहे का ? भोपळेला कोण पाठिशी घालतय आणि त्याला अटक कधी होणार हे प्रश्न उपस्थित झालेत.