पाकिस्तान टीमला भरलंय विजयाचं वारं

बांगलादेशात आयसीसी टी २- वर्ल्डकपला सुरूवात झाली आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचे क्रिकेट फॅन्समध्ये २१ मार्चच्या सामन्याविषयी उत्सुकता लागून आहे.

Updated: Mar 18, 2014, 11:33 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, इस्लामाबाद
बांगलादेशात आयसीसी टी २- वर्ल्डकपला सुरूवात झाली आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचे क्रिकेट फॅन्समध्ये २१ मार्चच्या सामन्याविषयी उत्सुकता लागून आहे.
क्रिकेट प्रेमींना या सामन्यात ब्लॉकब्लस्टर परफॉर्मन्सची अपेक्षा आहे. या सामन्यात कोण जिंकेल हे २१ मार्चच्या सायंकाळीच पाहायला मिळणार आहे.
पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनने मोहंमद हाफिजच्या नेतृत्वात पाकिस्तानी टीम विजय मिळवेल असं म्हटलं आहे. या वर्तमान पत्रात पाकिस्तानच्या विजयाच्या पाच शक्यता व्यक्त करण्यात आल्या आहेत.
दहशतवादाच्या कारणावरून पाकिस्तानी टीमला २००९ पासून एकही सामना खेळता आलेला नाही.
क्रिकेटची भूख पाकिस्तानी क्रिकेट फॅन्समध्ये आहे. तसेच आशिया कपच्या सामन्यामधील विजयानंतर भारतीय टीमला हे चांगलच कळलं आहे की, पाकिस्तान टीम सामन्यात कधीही कमबॅक करू शकते.
सर्वाधिक विकेट घेणारे पहिल्या तीन नंबरचे बोलर्सहे सध्या पाकिस्तानकडे आहेत, सईद अजमल, उमर गूल आणि शाहिद आफ्रिदी यांची नावं यात घेण्यात आली आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो
करा.