टीम इंडियाने २ एप्रिल २०११ रोजी मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर तब्बल २८ वर्षांनी कॅप्टन महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वाखाली वर्ल्ड कप जिंकण्याची किमया केली होती. या वर्ल्ड कप जेतेपदानंतर मात्र टीम इंडियाचा चढता आलेख ढासळायला लागला. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील व्हाईट वॉशने तर वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाला अस्मानंच दाखवलं.
१९८३ साली जिंकलेल्या वर्ल्ड कप जेतेपदाची पुनरावृत्तीचा क्षण अनुभवण्याकरता भारतीय फॅन्सना तब्बल २८ वर्ष वाट पाहावी लागली. वानखेडेवर झालेल्या २०११ वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताने श्रीलंकेचा पराभव करत चॅम्पियनशीपवर नाव कोरलं. वर्ल्ड चॅम्पियनशीपनंतर टीम इंडियाचा पहिला आंतरराष्ट्रीय दौरा होता तो वेस्ट इंडिजचा. या दौऱ्यात भारतीय टीम कॅरेबियन बेटांवर वन-डे आणि टेस्ट सीरिज खेळणार होती. या दौऱ्याची सुरूवात झाली ती एकमेव टी-20 मॅचने. या मॅचमध्ये टीम इंडियाने बाजी मारली
विंडीजविरूद्ध झालेल्या या वन-डे सीरिजकरता सीनिअर्सना विश्रांती देण्यात आली होती. सुरेश रैनाच्या नेतृत्वाखाली खेळताना यंगिस्तानने विंडीजविरूद्धची वन-डे सीरिज ३-२ ने जिंकली. तर ३ टेस्ट मॅचची सीरिज भारताने १-० ने जिंकत टेस्टमधील आपली बादशाहत कायम राखली.
वर्ल्ड कप जेतेपदाचा उत्साह आणि टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच नंबर वन झालेली टीम इंडिया खऱ्या अर्थाने क्रिकेटचे राजे झाले होते. आपला हा दबदबा कायम राखण्याचं आव्हान घेऊन भारतीय टीम इंग्लंडच्या दौऱ्यावर गेली. या दौऱ्याला ४ टेस्ट मॅचेसच्या सीरिजने सुरूवात झाली. मात्र प्रत्यक्षात जे मैदानावर घडलं ते भारतीय फॅन्सना धक्का देणार ठरलं. फॉर्म आणि फिटनेसच्या चक्रव्युहात अडकलेल्या टीम इंडियाला ४ टेस्ट मॅचेसच्या सीरिजमध्ये व्हाईटवॉशला सामोरं जावं लागलं.
टेस्ट सीरिजमध्ये आऊट ऑफ फॉर्म दिसणाऱ्या टीम इंडियासमोर वन-डेतील आपलं आव्हान टिकवण्याचं आव्हान होतं. इंग्लंडविरूद्ध ५ वन-डे मॅचेसच्या सीरिजपुर्वी ठेवण्यात आलेल्या एकमेव टी-२० मध्येही भारताचा पराभव झाला.
इंग्लंडविरूद्ध वन-डे सीरिजमध्येही भारताचा फ्लॉप शो कायम राहिला. ५ वन-डे मॅचेसच्या सीरिजमध्ये भारताला तीन वन-डेत इंग्लंडकडून दारूण पराभवाला सामोरं जावं लागलं. या सीरिजमधील पहिली मॅच पावसात वाहुन गेली. तर चौथी वन-डे डकवर्थ-लुईस नियमानुसार ड्रॉ झाली.
इंग्लंड दौऱ्यातल्या कटू आठवणी घेऊन आणि टेस्टमधील नंबर वन स्थान गमावून भारतात परतलेल्या टीम इंडियावर बरीच बोचरी टीका झाली. पण भारताला झालेल्या या मानहानीकारक पराभवाची परतफेड करण्याची नामी संधी आयतीच चालून आली. मायदेशात भारताची धुळधाण उडवणारी इंग्लंडची टीम पाच वन-डे मॅचेसच्या सीरिजकरता भारताच्या दौऱ्यावर आली.
या संपुर्ण वन-डे सीरिजमध्ये टीम इंडियाने इंग्लंडची सळो की पळो स्थिती केली. आणि वन-डे सीरिजमध्ये इंग्लंडला व्हाईटवॉश देत झालेल्या पराभवाची परतफेड केली. भारताच्या दौऱ्यावर आलेल्या इंग्लंडला मात्र भारताविरूद्ध कोलकाता येथे झालेल्या एकमेव टी-२० मॅचमध्ये विजय मिळवता आला. इंग्लिश टीमच्या भारतीय दौऱ्यानंतर वेस्ट इंडियन टीम वन-डे आणि टेस्ट सीरिजकरता भारताच्या दौऱ्यावर आली.
३ टेस्टच्या या सीरिजमध्ये भारताने वेस्ट इंडिजचा २-० ने पराभव केला. या टेस्टमध्ये भारताचा फाईंड ठरला तो मॅन ऑफ द सीरिज ठरलेला ऑफ स्पिनर आर. अश्विन. विंडिजविरूद्ध वन-डे सीरिजमध्येही भारतीय टीम वरचढ ठरली. आणि ५ वन-डे मॅचेसची सीरिज टीम इंडियाने ४-१ अशी सहज खिशात घातली.
इंग्लंडमधील दारूण पराभवानंतर मायदेशात सलग दोन सीरिज विजय मिळवणाऱ्या टीम इंडियाचा आत्मविश्वास उंचावला होता. कांगारूंना त्यांच्याच मायभुमीत पराभुत करण्याच्या उद्देशाने गेलेल्या टीम इंडियाने मात्र इंग्लंड दौऱ्यात झाले