सैरभैर बिबट्या

Updated: May 10, 2012, 07:26 AM IST

www.24taas.com, मुंबई

मे 2012

 ठिकाण : आरे कॉलनी,  मुंबई

         पाच वर्षाचा मुलगा ठरला बिबट्याचं भक्ष्य

-----------------------------------------------

    मे 2012

ठिकाण : भेंडा खुर्द, नेवासा

      बिबट्या विहिरीत पडला

--------------------------------

4 एप्रिल 2012

ठिकाण : निफाड, नाशिक

एक वर्षाच्या मुलावर बिबट्याचा घाला

 

-----------

7 एप्रिल 2012

ठिकाण : मुलुंड, मुंबई

 बिबट्याची  शाळेत हजेरी 

-----------------------------

12 एप्रिल 2012

ठिकाण : दिंडोरी, नाशिक

बिबट्याच्या हल्ल्यात दोघे जखमी

------------------

19 एप्रिल 2012

ठिकाण : वणी, नाशिक

 बिबट्याच्या हल्ल्यात चौघे जखमी

-----------------

28 एप्रिल 2012

ठिकाण : निफाड, नाशिक

बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षाचा मुलगा ठार

-----------

मार्च 2012

ठिकाण :रामवाडी,नाशिक

बिबट्याच्या हल्ल्यात चारजण जखमी

--------------------

गेल्या पाच महिन्यात  बिबट्याशी माणसाचा  वारंवार सामना झाल्याचं या घटनांवरुन सहज लक्षात येईल...पण  या प्राण्याचा, माणसांच्या वस्तीतील वावर का  वाढलाय ?  माणसांवरचे बिबट्याचे हल्ले का वाढलेत  ? बिबट्याचे हल्ले रोखणं शक्य आहे का? असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले असून बिबट्याचा वावर असलेल्या भागात त्याच्या दहशतीमुळे  जनतेची झोप उडालीय..

 

मुंबई शहर हे आता काँक्रीटचं जंगल झालं आहे..आणि तीच अवस्था आता उपनगरांची ही झालीय...पण संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामुळे  मुंबईच्या मध्यभागी जंगल अद्यापही श्वास घेतयं.. या जंगलातील बिबटे आता नागरी वस्तीतही दिसू लागले आहेत...बिबट्याच्या वारंवार होणा-या दर्शनामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये मोठी दहशत निर्माण झालीय..

 

जेमतेम 30-35 घरं असलेला आरे कॉलनीतील हा मथाईपाडा बिबट्याच्या वावराने चांगलाच दहशतीखाली आलाय....खरंतर गेल्या अनेक वर्षांपासून  मथाईपाडा आणि आजूबाजूच्या परिसरात बिबट्याचा वावर आहे.. मात्र  त्याचा कधी त्रास झाला नसल्याचं इथले रहिवासी सांगतात ...पण अलिकडच्या काळात या परिसरात बिबट्याची दहशत वाढली... या परिसरातील अनेक कुत्री, कोंबड्यांना बिबट्याने आपलं भक्ष्य बनवलं आहे.  गेल्या आठवड्यात इथं  जे काही घडलंय त्यामुळे इ

Tags: