www.24taas.com, कोल्हापूर
लालफितीत अडकलंय महालक्ष्मीचं मंदिर !
आदिशक्तीच्या प्रसादाला लागलंय ग्रहण !
मंदिर परिसरात मूलभुत सेवासुविधांचा वानवा !
दार उघड बये दार उघड !
साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असणा-या महालक्ष्मी मंदिरात लाडुच्या प्रसादाचा ठेका महिला बचत गटांना देण्यासाठी 6 जुन 2012 ला पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समीतीच्यावतीनं जाहीर कोटेशन काढण्यात आलं. त्यानंतर 8 ऑगस्टला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष उदय पवार यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवुन महिला मासीक पाळीच्यावेळी जर कामावर आल्या तर प्रसादाचं पावित्र नष्ठ होवु शकतं, त्यामुळं महिला बचत गटांना लाडु प्रसादाचं टेंडर देवू नये अशी मागणी केली. साडेतीन शक्तीपिठांपैकी एक पिठ अशी गणना होणा-या कोल्हापूरच्या महालक्ष्मीला लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात.
मात्र भक्तांना इथं पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत सुविधेपासूनही वंचित रहावं लागतंय. यामुळे भाविकांमध्ये नाराजी आहे. देवस्थान समितीला अध्यक्षचं नसल्यानं मंदीर परिसरात मूलभूत सुविधांची वानवा निर्माण झालीय. कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं मंदिर देशभरातील भक्तांसाठी श्रद्धास्थान आहे...दरवर्षी लाखो लोक देवीच्या दर्शनासाठी इथं येत असतात.. मात्र मोठ्या श्रद्धेनं दर्शनासाठी येणा-या भक्तांना अनेक अडअचणींचा सामना करावा लागतोय..देवस्थान मंदिर समिती भक्तांसाठी मूलभूत सुविधाही उपलब्ध करुन देण्यात अपयशी ठरल्याचं पहायला मिळतंय...पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे... मंदिर परिसरात पिण्याची पाण्याची तीव्र टंचाई आहे...
पिण्याच्या पाण्याचे नळ असले तरी त्याला पाणी येत नाही...त्यामुळे इथं टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय. महाराष्ट्रातलं हे प्रसिद्ध मंदिर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडं या मंदिराची जबाबदारी असून कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राजाराम माने हे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समीतीचे अध्यक्ष आहे...पण ते पुर्णवेळ मंदिर व्यवस्थानाकडं लक्ष देवून शकत नसल्यामुळे अध्यक्षाची नेमणूक करण्याची मागणी होवू लागलीय.... राज्यातील सत्ताधारी आघाडी सरकारच्या सत्ता वाटपानुसार पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समीतीचं अध्यक्षपद काँग्रेसच्या वाट्याला आलं आहे..काँग्रेसमधील अंतर्गत वादामुळे गेल्या ३ वर्षापासासून मुख्यमंत्र्यांनी अध्यक्षपदाची नियुक्ती करण्याचं टाळलं आहे..आणि त्याचाच फटका मंदिर समितीला आणि पर्यायाने भक्तांना बसला आहे..
नवरात्रौत्सवात दरदिवशी मोठ्या प्रमाणात भक्त महालक्ष्मीच्या दर्शनासाठी येतात...भक्तांचा वाढता ओघ लक्षात घेता भक्तांसाठी मुलभूत सेवा सुविधा उपलब्ध करण्याची आवश्यकता आहे...मात्र त्या सेवासुविधांपासून भक्तांना वंचित रहावं लागतंय.. महालक्ष्मीच्या दर्शानासाठी येणारे भक्त मंदिरातील देणगीपोटीत दरवर्षी कोट्यावधीचं दान टाकतात..मंदिराला चांगलं उत्पन्न असतांनाही भक्तांना मूलभूत सुविधाही पुरवल्या जात नाहीत. त्यामुळे इथं येणा-या भक्तांमधून नाराजी व्यक्त केली जातेय. नवरात्र उत्सव तोंडावर आला असून यावर्षीही मोठ्याप्रमाणात भक्त लोक देवीच्या दर्शनासाठी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे ... यापार्श्वभूमीवर य़ंदातरी मंदिर समिती भक्तांना मुलभूत सेवा सुविधा पुरणार का हाच खरा प्रश्न आहे.... कोल्हापूरातील महालक्ष्मी मंदिर...दक्षिण काशी अशी या देवस्थानाची ओळख आहे...
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी हे एक अत्यंत महत्वाचं शक्तीपीठ आहे.... त्यामुळेच कोल्हापूरात देवीच्या दर्शनाला नेहमीच गर्दी असते...करवरनगरीतील महालक्ष्मी मंदिराचंही वेगळ असं महत्व आहे.. हे मंदिर हेमडपंथी बांधकामाचा उत्कुष्ठा नमुना आहे.. काळ्या पाषाणातून आणि उखळीपद्धतीने या मंदिराचं बांधकाम करण्यात आलं असून मंदिर सर्वतोभद्र चक्राकार आहे.. कोल्हापूर शहराच्या मध्यभागी पश्चिमाभिमुख हे मंदिर असून मंदिराच्या चारही बाजूला भव्य दरवाजे आहेत..हेमंदिर नेमकं कधी उभारलं गेलं या विषयी माहिती उपलब्ध नसली तरी सुमारे चार हजार वर्षांपूर्वी हे मंदिर बांधण्यात आलं असावं असा अंदाज आहे..रंकभैरवाच्या माळावर खाणी पाडून तिथला काळा पाषाण मंदिराच्या बांधकामासाठी वापरण्यात आला आहे..त्या खाणींची जागा म्हणजे आजचा रंकाळा तलाव असंही मानलं जातंय.. मंदिरासाठी वापरण्यात आलेल्या काळ्या दगड