www.24taas.com, झी मीडिया, सिंधुदुर्ग
सिंधुदुर्गात राणेंचा पराभव होईपर्यंत अनवाणी फिरण्याची प्रतिज्ञा करणारे कट्टर शिवसैनिक अरविंद भोसले हे आता लवकरच पायात चप्पल घालणार आहेत.
नऊ वर्षांपूर्वी नारायण राणेंनी पोटनिवडणुकीत शिवसेनेचा पराभव केला होता. त्यानंतर राणेंचा पराभव होईपर्यंत चप्पल घालणार नाही, अशी प्रतिज्ञा भोसले यांनी केली होती. आता या लोकसभा निवडणुकीत निलेश राणे यांचा पराभव झालाय. त्यामुळं भोसले पायात चप्पल घालणार आहेत.
शिवसेनेत असताना आणि शिवसेनेतून बाळासाहेब ठाकरे यांनी बाहेर काढल्यानंतरही तळकोकणावर आपलं एकहाती वर्चस्व राखणारे `दादा` नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या साम्राज्याला अखेर १० वर्षांच्या लढाईनंतर शिवसेनेनं धक्का दिला. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात राणे यांचे पुत्र नीलेश राणे यांच्यावर शिवसेनेचे विनायक राऊत यांनी तब्बल सव्वा लाखाहून अधिक मतांनी मात केली आहे. दरम्यान, मुलाच्या पराभवानंतर नारायण राणे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.