www.24taas.com, वृत्तसंस्था, तेजपूर/आसाम
आसामच्या तेजपूर मतदार क्षेत्रातील सुदूर गावामध्ये राहणाऱ्या एका कुटुंबातील 301 सदस्यांनी आज आपल्या मतदानाचा हक्क बजावला. हे सर्व मतदार एकाच कुटुंबातले असून एकाच गावातही राहतात. त्यांचे पुर्वज नेपाळहून येवून इथं स्थायिक झाले होते.
अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार मतदारांमध्ये 175 पुरुष आणि 126 स्त्रिया आहेत. रंगापाडा विधानसभा क्षेत्रांतर्गत येणाऱ्या फुलगुरी नेपालीपम गावांत हे सर्व लोक मतदान करतात. मात्र गावाबाहेर असल्यामुळं कुटुंबातील 20 जणं मतदान करू शकले नाही.
हे सर्व मतदार अहिमन थापा यांचे वंशज आहेत. जे 1888 साली नेपाळहून इथं स्थायिक झाले. सर्वजण अधिकृत मतदार आहेत. या कुटुंबाशिवाय त्यांच्या गावात 94 चहाचा मळा असलेले कुटुंब, 28 अल्पसंख्याक समूह, आठ बंगाली आणि सहा बोडो कुटुंब राहतात.
अहिमन थापा, त्याचा मुलगा धनमन थापा आणि नातू रोन बहादूर थापा सोबत आले होते. 1988मध्ये त्यांना गावातील मुख्य व्यक्ती म्हणून निवडण्यात आलं. रोन बहादूरच्या पाच बायका आणि 21 मुलं आहेत. शिवाय पुतणेही आहेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.