www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
'आप' पाठोपाठ शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनंही लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या पहिल्या १८ उमेद्वारांची नावं जाहीर केली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते डी पी त्रिपाठींनी पत्रकार परिषद घेऊन उमेदवारांच्या नावांची घोषणा केलीय. यात १२ नव्या चेह-यांना संधी देण्यात आली आहे,
मुख्य म्हणजे, राष्ट्रवादीच्या या पहिल्याच यादीत केवळ दोन महिलांच्या नावाचा समावेश आहे. तर गेल्या वेळी शिवसेनाच्या तिकीटावरून निवडणूक लढलेले आनंद परांजपे यावेळी मात्र राष्ट्रवादीच्या तिकीटावरून लोकसभा निवडणूक लढणार आहेत.
गोपीनाथ मुंडे आणि राजू शेट्टी यांच्याविरोधात कोण लढणार, हे मात्र अजून ठरलेलं नाही. कारण राष्ट्रवादीनं बीड, हातकणंगलेसह मावळ आणि हिंगोलीमध्ये उमेदवार अजून जाहीर केलेले नाहीत.
राष्ट्रवादीची पहिली यादी...
* नाशिक - छगन भुजबळ
* बारामती - सुप्रिया सुळे
* भंडारा-गोंदिया - प्रफुल्ल पटेल
* मुंबई उत्तर - पर्व - संजय दिना पाटील
* कल्याण - आनंद परांजपे
* बुलडाणा - कृष्णराव इंगळे
* दिंडोरी - भारती पवार
* रावेर - मनीष जैन
* अमरावती - नवनीत कौर-राणा
* शिरुर - देवदत्त निकम
* सातारा - उदयनराजे भोसले
* परभणी - विजय भांबळे
* माढा - विजयसिंह मोहिते-पाटील
* जळगाव - सतीश पाटील
* उस्मानाबाद - पदमसिंह पाटील
* ठाणे - संजीव नाईक
* कोल्हापूर - धनंजय महाडिक
* नगर - राजीव राजळे
* मावळ - लक्ष्मण जगताप (अजून निश्चित नाही)
* हातकणंगले - (अजून निश्चित नाही)
* हिंगोली - (अजून निश्चित नाही)
* बीड - (अजून निश्चित नाही)
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.