www.24taas.com,वॉशिंग्टन
ब्लड प्रेशन नियंत्रित ठेवण्यासाठी प्रत्येक जण डॉक्टरांचा सल्ला घेत असतो. तर कोणी नेहमी ब्लड प्रेशरची तपासणी करतो. कमी मीठ खावे तसेच आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे हा सर्वौत्तम उपाय आहे.
आपण दररोज १,५०० मिलीग्रॅम पेक्षा कमी मीठ खात असाल तर ते आरोग्यासाठी म्हणजे ब्लड प्रेशरसाठी चांगली बाब आहे. त्यामुळे हृदय विकार आणि रक्तदाब यावरील आजारांसाठी लढण्यासाठी एक चांगला उपाय ठरू शकतो.
अमेरिकन हार्ट असोसिएशनचे अध्यक्ष याने याबाबत एक माहिती पत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यांनी यात म्हटले आहे की, प्रत्येक माणसाने दररोज १,५०० मिलीग्रॅम पेक्षा कमी मीठ खावे. हा निष्कर्श त्यांनी केलेल्या अभ्यासातून काढला आहे.
अभ्यासकांच्या मते १,५०० मिलीग्रॅम पेक्षा कमी मीठ खाल्ले तर उच्च रक्त दाबापासूनची जोखीम कमी होते. याशिवाय हृदय आणि रक्त यासंबंधीत आजारांपासूनट सुटका होते. तर हृदय विकाराचा झटका येण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे कमी मीठ खाणे केव्हाही चांगले.