नोकरी गमावण्याच्या भीतीने गमावतात आरोग्य

आपल्याला कुठल्याही क्षणी नोकरी गमवावी लागू शकते, या भीतीपोटी अनेकजण आपलं आरोग्य गमवत आहेत. अमेरिकेतील शास्त्रज्ञांना संशोधनातून या गोष्टीची माहिती मिळाली आहे. नोकरीच्या काळजीनेच अनेक लोकांच्य़ा तब्येतीवर परिणाम होत असल्याचं समोर आलं आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Sep 12, 2012, 04:52 PM IST

www.24taas.com, वॉशिंग्टन
आपल्याला कुठल्याही क्षणी नोकरी गमवावी लागू शकते, या भीतीपोटी अनेकजण आपलं आरोग्य गमवत आहेत. अमेरिकेतील शास्त्रज्ञांना संशोधनातून या गोष्टीची माहिती मिळाली आहे. नोकरीच्या काळजीनेच अनेक लोकांच्य़ा तब्येतीवर परिणाम होत असल्याचं समोर आलं आहे.
मिशिगन युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी या विषयावर संशोधन केले आहे. यासाठी अनेक कर्मचाऱ्यांचं सर्वेक्षण केलं. सर्वेक्षणात त्यांच्या लक्षात आलं की इतर कर्मचाऱ्यांच्या तुलनेत ज्या कर्मचाऱ्यांना नोकरी गमावण्याची भीती असते, त्यांच्या आरोग्यावर चौपट दुष्परिणाम होताना आढळला आहे. तसंच त्यांना गंभीर आजार होण्याची शक्यता सात पटींनी वाढते.
नोकरीच्या बाबतीत वाढती असुरक्षितता आरोग्य बिघडवण्यास कारणीभूत ठरत आहे. या संशोधनासाठी ४४० कर्मचाऱ्यांचं सर्वेक्षण करण्यात आलं. त्यातील १८ टक्के लोकांना आपली नोकरी कधीही जाऊ शकते, या भीतीने ग्रासलं होतं. या लोकांच्या झोपण्यावर, जेवणावर वाईट परिणाम झालेला आढळून आला. यातून संशोधन करताना वरील निष्कर्ष काढण्यात आला.