यशस्वी मंगळ मोहिम आणि आनंदोत्सव

Sep 24, 2014, 19:51 PM IST
1/11

४४० न्यूटन बल निर्माण करणारी ही मोटार ३०० दिवस बंद होती, ती सोमवारी चार सेकंदांसाठी प्रज्वलित केली गेली. हा टप्पा यशस्वी पार पडला.

2/11

भारताचे मंगळयान (मार्स ऑरबायटर मिशन-मॉम) हे पीएसएलव्ही प्रक्षेपकाच्या मदतीने श्रीहरिकोटा येथून मंगळाच्या दिशेने पाठवण्यात आले होते. ६६.६० कोटी कि.मी. अंतराच्या या प्रवासात मंगळयान १ डिसेंबर २०१३ रोजी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणातून मुक्त झाले होते. 

3/11

मंगळाच्या कक्षेत दाखल झालेले हे मंगळयान १ डिसेंबरला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेतून बाहेर पडले होते. 

4/11

अपुरी साधने आणि अनेक मर्यादा असतानाही केवळ विश्वास आणि पुरुषार्थाच्या बळावर इस्रोच्या शास्त्रज्ञांनी मोठे यश मिळवले आहे, असं नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.

5/11

बुधवारच्या अंतिम टप्प्याची रंगीत तालीम म्हणून सोमवारी लिक्विड अ‍ॅपोजी मोटार चाचणी करण्यात आली होती. ही मोटार ३.९६८ सेकंद प्रज्वलित केली गेली.

6/11

जगातील विविध देशांनी आजपर्यंत मंगळावर ५१ मोहिमा आखल्या असून, त्यातील केवळ २१ यशस्वी झाल्या आहेत. मात्र, भारत पहिल्याच प्रयत्नात यशस्वी ठरल्यामुळे अंतराळ संशोधन क्षेत्रात देशाचे नाव उंचावले आहे.

7/11

मंगळमोहिमेच्या या परमोच्च क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) टेलिमेट्री ट्रॅकिंग अँड कमांड नेटवर्क (इस्ट्रॅक) येथे उपस्थित

8/11

पहिल्याच प्रयत्नात भारताच्या मंगळयानाने बुधवारी सकाळी मंगळाच्या कक्षेत प्रवेश केला.

9/11

मागील ३०० दिवसांपासून निद्रितावस्थेत असलेल्या लिक्विड अ‍ॅपॉजी मोटर या इंजिनाला प्रज्वलित करण्याचा प्रयोग सोमवारी यशस्वी ठरल्यानंतर या मोहिमेची तयारी अंतिम टप्प्यात पोहचली होती. बुधवारी सकाळी चार वाजून १७ मिनिटांनी इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी सर्व प्रक्रियेला सुरूवात केली.

10/11

मंगळमोहिम यशस्वी झाल्यानंतर इस्रोच्या कर्मचा-यांचा एकच जल्लोष

11/11

मार्स ऑर्बिटर यानाने (मंगळयान) बुधवारी सकाळी यशस्वीपणे मंगळ ग्रहाच्या कक्षेत प्रवेश केला.  भारताच्या ऐतिहासिक मंगळ मोहिमेच्या यशावर शिक्कामोर्तब