नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचं दिल्लीतील सिटी फोर्ट सभागृहात भाषण झालं. या भाषणाला २ हजार विद्यार्थी उपस्थित होते.
भाषणाची सुरूवात बराक ओबामा यांनी 'नमस्ते'ने केली आणि सांगितलं की, भारताच्या युवकांमध्ये मला एक आशेचा किरण दिसतोय.
प्रजासत्ताकदिनाला विशेष अतिथी म्हणून आपल्याला आमंत्रण दिलं म्हणून भारताचे धन्यवाद मानले, आणि बराक ओबामा म्हणाले 'बहुत धन्यवाद'
यानंतर ओबामा म्हणाले, 'मला मोटरसायकलचा प्रवास खूप आवडतो, पण सीक्रेट सर्व्हिसेसने मला मोटरसायकल चालवण्याची परवानगी दिली नाही'.
बराक ओबामा जेव्हा मंचावर भाषण करायला आले, तेव्हा लोकांना ओबामांचं ओबामा..ओबामा..ओबामा म्हणून स्वागत केलं आणि आपल्या स्मार्ट फोनमध्ये फोटोही टिपले.
दिवाळीचा दीपोत्सव
ओबामांनी मागील दौऱ्याचा संदर्भ देतांना सांगितलं, 'मागील दौऱ्याला आम्ही आलो होतो, तेव्हा आम्ही दिवाळी साजरी केली, डान्सही केला, पण यावेळी हे शक्य झालं नाही', 'मात्र मागच्या वर्षी आम्ही व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी केली होती'.
'मार्टिन लूथर किंग आणि महात्मा गांधी हे माझे आदर्श आहेत, आणि हेच कारण आहे की भारत आणि अमेरिका आज सोबत असावेत', असं ओबामांनी सांगितलं.
ओबामा पुढे म्हणाले, 'आणखी एक संबंध आहे, जो भारत-अमेरिकेला जोडून ठेवतो, अमेरिकेने भारताच्या एका व्यक्तीचा सन्मान केला होता, ते होते विवेकानंद, ज्यांनी अमेरिकेत हिंदू धर्माचा प्रचार केला आणि त्यांनी हेच म्हटलं होतं, अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो, आणि मी आज पुन्हा हेच म्हणतोय, माझ्या भारतीय बंधू आणि भगिनींनो'.
ओबामा म्हणाले, 'भारत आणि अमेरिका ज्ञान आणि संशोधनाला वाव देत आहेत. दोन्ही देशांनी अंतराळ क्षेत्रात मोठं काम केलं आहे. आपण अशा निवडक देशांमध्ये आहोत, जे चंद्रावर जाऊन आले आहेत आणि ज्यांना अंतराळात मोठं यश लाभलंय'.
सोशल मीडियाचा उल्लेख करतांना ओबामा म्हणाले, 'आता तर आपण फेसबुक, ट्विटर, व्हाटसअॅपने एकमेकांशी जोडले गेलो आहोत. तसेच भारत आणि अमेरिका हे चांगले मित्र होऊ शकतात.'
ओबामा म्हणाले, 'जगात भारताचं काय स्थान असेल हे भारताला ठरवायचं आहे, मात्र आम्हाला वाटतंय भारत आणि अमेरिकाने मिळून मोठ मोठी कामं करावीत. शेतकऱ्यांना तंत्रज्ञान मिळेल, स्वच्छ पाणी मिळेल, मुलांचं भविष्य सुरक्षित होईल, अमेरिका भारताच्या विकास यात्रेत सहभागी होऊ इच्छीतो, आम्ही नवनवीन कल्पना, योजना आखण्यासाठी अमरिका आपला सहकारी होऊ इच्छीत आहे'.
ओबामा यांनी पर्यावरण आणि सुरक्षेचा उल्लेख करतांना म्हटलं, 'दोन्ही देश दहशतवादाचा धोका ओळखून आहेत. अमेरिका भारताचं संरक्षण क्षेत्रातही स्वागत करीत आहे'.
'आमचं लक्ष्य असं आहे की जगात आण्विक अस्त्र नसावीत, असं जग निर्माण करू या, भारताला यासाठी आमची पूर्ण मदत करावी लागेल. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा विस्तार होऊन भारताला स्थायी सदस्यत्व मिळावं'. असं ओबामा म्हणाले.
महिलांचं महत्व
भारताने स्वच्छ उर्जा उत्पादनात पुढाकार दाखवला आहे, भारताने उचललेल्या या पावलाचं स्वागत आहे.
ओबामांनी आपल्या भाषणात काळ्या गोऱ्या भेदभावाचाही उल्लेख केला, असे भेदभाव सर्वच ठिकाणी आहेत, भारतातही.
ओबामा म्हणाले, माझे आजोबा लष्करात खानसामा होते, पत्नी मिशेलच्या परिवारातील लोक गुलाम राहिले आहेत, गुलामांचे मालकही होते, मी भेदभाव अनुभवला आहे, माझ्या रंगामुळे, पण तरीही आम्ही पुढे आलो आहोत. आम्ही अशा देशामध्ये राहत आहोत, जेथे एक खानसामाचा नातू राष्ट्रपती होऊ शकतो आणि एक चहावाला पंतप्रधान.
दोन्ही देश तेव्हाच मजबूत होतील जेव्हा ते आपल्या देशातील महिलांचा सन्मान करतील.
ओबामा पुढे म्हणाले, तुम्हाला माहित आहे मिशेलच्या बाबतीत, जे तिला वाटतं ते मला ती बोलून दाखवते, आणि असं नेहमी होतं, मला दोन मुली आहेत. अमेरिकेत महिलांना संपूर्ण अधिकार देण्याचा प्रयत्न केला जातो.
भारतात घराघरात आई आणि पत्नी परिवार एक ठेवते, सरकारमध्ये काही महिला नेत्या आहेत. काही देश तेव्हाच सफल होतात, जेव्हा त्या देशातील महिला सशक्त असतात.
मला खूप आनंद झाला, जेव्हा दिल्लीत एका महिला विंग कमांडरने माझं स्वागत केलं, मानवंदना दिली.
अनेकतेत एकता
बराक ओबामा म्हणाले, एखाद्या देशाबद्दल तेव्हाच माहित होतं, की ते आपल्या देशातील मुलींशी कसं वागतात.
ओबामा यांनी महात्मा गांधी यांचा दाखला देतांना म्हटलंय, सर्व देशांना आपल्या धर्माचं पालन करण्याचं स्वातंत्र्य हवं, ओबामा यावर पुढे म्हणाले, मी एक मानतो, जे गांधीजींनी म्हटलं आहे, प्रत्येक धर्म एक फुलाच्या पाकळ्यांसारखा आहे, अनेक वेळा लोक माझ्या धर्मावर प्रश्नचिन्हं लावतात, कारण ते मला ओळखत नाहीत.
भारतही तेव्हाच यशस्वी होईल, जेव्हा सर्व धर्माच्या नावावर वेगळे होणार नाही, कोणत्या दुसऱ्या मुद्यावर वेगळे होणार नाहीत.
यावर ओबामा म्हणाले, तुम्ही शाहरूख खानचा सिनेमा पाहतात, मिल्खा सिंह तुमचा अॅथलीट आहे, मेरी कॉम आहे, याचं यश सर्वांना एक ठेवतं, हीच गोष्ट भारताला विविधतेतून एक ठेवते, मजबूत बनवते.
कोणत्या देशाकडे किती लष्कर, किती हत्यारं आहेत, यावर तो देश मोठा होत नाही, मात्र देश यावर निश्चित मोठा होतो, त्या देशाचे लोक काय विचार करतात. देशाचे लोक विविधता कशी वाचवतात, कशी ठेवतात, ही विविधता टिकवण्याची जबाबदारी देशातील युवकांची आहे, जगाला दिशा देण्याची जबाबदारी युवकांची आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.