भाजपची बैठक, मोदी कुठून लढणार लोकसभा निवडणूक?

लोकसभा उमेदवारांची तिसऱ्या यादीसंदर्भात आज भाजपची महत्त्वपूर्ण बैठक होतेय. त्यासाठी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. या बैठकीसाठी भाजपचे सर्व ज्येष्ठ नेते उपस्थित असतील.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Mar 13, 2014, 10:36 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
लोकसभा उमेदवारांची तिसऱ्या यादीसंदर्भात आज भाजपची महत्त्वपूर्ण बैठक होतेय. त्यासाठी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. या बैठकीसाठी भाजपचे सर्व ज्येष्ठ नेते उपस्थित असतील. यामध्ये भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नेमके कुठून निवडणूक लढणार? याची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
भाजपच्या तिसऱ्या यादीमध्ये जवळपास १५० जणांची नावं असण्याची शक्यता वर्तवली जातेय. तसंच वाराणसी, लखनऊच्या जागेचा पेचही आज सुटण्याची शक्यता आहे. मोदी, राजनाथ सिंह तसंच मुरली मनोहर जोशी यांच्या उमेदवारीचीही आज घोषणा होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात पुण्यातून प्रकाश जावडेकर, सोलापुरातून शरद बनसोडे, उत्तर मध्य मुंबईतून पूनम महाजन, भिवंडीतून कपिल पाटील यांची नावं चर्चेत आहेत.
दरम्यान, नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनवण्यासाठी वाराणसीमध्ये होमहवन करण्यात आला. कार्यकर्त्यांनी मोदींसाठी प्रार्थनाही केली. भाजपच्या अनेक जागांवरील पेच सुटावा यासाठी काल अमित शहा यांनी आरएसएसच्या नेत्यांची भेटही घेतली.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.