नवी दिल्ली : केंद्र सरकारनं मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीज, BP आणि NIKO या तिन्ही पार्टनरना तब्बल दहा हजार कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. RIL ला सकाळीच याबाबतची नोटीस सरकारकडून पाठवण्यात आली आहे.
हा दंड भरण्यासाठी महिनाभराचा वेळ देण्यात आला आहे. 10 हजार कोटींमधली तब्बल 60 टक्के म्हणजेच सहा हजार कोटी रक्कम RIL ला भरावी लागणार आहे. तर 30 टक्के रक्कम BP ला आणि उर्वरित 10 टक्के रक्कम NIKO ला भरावी लागणार आहे. दरम्यान रिलायन्स इंडस्ट्रीज याविरोधात आर्बिट्रेशनमध्ये जाणार आहे.
ओएनजीसीच्या मालकीचा असलेला कृष्णा गोदावरी खोऱ्यातला गॅस रिलायन्सनं व्यावसायिक वापरासाठी केल्याचा ठपका ठेवत हा दंड ठोठवण्यात आला आहे.