www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरण खटल्याचा निकाल आज दुपारी अडीच वाजता लागणार आहे.
सरकारी आणि बचाव पक्षाच्या वकीलांचा युक्तीवाद मंगळवारी पूर्ण झाला होता. त्यानंतर कोर्टानं आपला निर्णय शुक्रवारपर्यंत राखून ठेवला होता. आज दुपारी अडीच वाजता आरोपींना शिक्षा सुनावली जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, दोषी असलेल्या चारही आरोपींना दिल्लीच्या साकेत कोर्टात हजर करण्यात आलं होतं. यावेळी सरकारी वकीलांनी आरोपींच्या फाशीची शिक्षेची मागणी केली होती. तर बचाव पक्षाच्या वकीलांनी जन्मठेपेची मागणी केली होती. आरोपींना सुधारण्याची एक संधी द्यावी, आरोपींचं वय लक्षात घ्यावं, व्यक्ती जन्मानं खूनी असत नाही, असा युक्तीवाद बचाव पक्षाच्या वकिलांनी केलाय. आरोपी पवन गुप्ता याच्या हातून दारुच्या नशेत असताना गुन्हा घडला आहे. राजकीय आणि जनतेच्या दबावाखाली शिक्षा नको, असंही बचाव पक्षाचं म्हणणं आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.