गुरदासपूर हल्ला : दहशतवादी आले होते ज्या कारमध्ये त्याबाबत मोठा खुलासा

पंजाबच्या गुरूदासपूर जिल्ह्यात संशयीत दहशतवादी हल्ल्यात लष्करी अधिकाऱ्यांचा युनिफॉर्म घालून आलेल्या बंदूकधारींनी आज एक बस, आरोग्य केंद्र आणि पोलीस स्टेशनवर हल्ला केला. यात एका पोलिस कर्मचाऱ्यासह सहा जणांची मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झालेत. 

Updated: Jul 27, 2015, 04:24 PM IST
गुरदासपूर हल्ला  : दहशतवादी आले होते ज्या कारमध्ये त्याबाबत मोठा खुलासा title=

गुरदासपूर : पंजाबच्या गुरूदासपूर जिल्ह्यात संशयीत दहशतवादी हल्ल्यात लष्करी अधिकाऱ्यांचा युनिफॉर्म घालून आलेल्या बंदूकधारींनी आज एक बस, आरोग्य केंद्र आणि पोलीस स्टेशनवर हल्ला केला. यात एका पोलिस कर्मचाऱ्यासह सहा जणांची मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झालेत. 

दहशतवाद्यांनी आज पहाटे शहरात घुसून बेछूट गोळीबार केला. एका प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार दहशतवादी लष्कऱाचा युनिफॉर्म घालून आले होते. ते सर्व एका मारुती कारमध्ये आले होते. आता या कार संदर्भात मोठा खुलासा झाला आहे. तिचे रजिस्ट्रेशन पंजाबचे आहे. 

कारचे संपूर्ण विवरण पुढील प्रमाणे 

- मारुती कार ८००० सीसी
- रजिस्ट्रेशन नंबर - PB09 B7743
- कारचा चेचिस नंबर - 1158947
- कारचा इंजिन नंबर- 1565626
- कारचा मॉडेल नंबर- 1997

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोरांनी रस्त्याच्या कडेला असलेल्या एका ढाब्याला आपल्या निशाणा बनविला. त्यानंतर एका व्यक्तीकडून त्याची मारूती कार हिसकावून घेतली. मारुती ८०० असलेली ही कार पंजाबची होती. त्यानंतर त्यांनी दिनानगर बायपास जवळ एका रस्त्याच्या किनाऱ्यावर असलेल्या एका विक्रेत्याला गोळी मारली. त्यानंतर दिनानगर जवळच्या एका आरोग्य केंद्राला टार्गेट केले. यात तीन नागरिकांसह एका पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. 

एक स्थानिक नागरीक कमलजीत सिंह मथारू याने सांगितले की, हल्लेखोरांनी गोळीबार करून माझी कार हिसकावून घेतली. ते लष्कराच्या गणवेशात होते तसेच त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात हत्यारं होती. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.