नवी दिल्ली : जर तुम्ही नव्या वर्षात कार घेण्याचा विचार करत आहात तर तुमच्यासाठी ही एक मोठी बातमी आहे. देशातील नामांकित कार कंपन्यांनी नव्या वर्षांत मोटारीचे दर वाढवण्याचा निर्णय घेतलाय. मारुती सुझुकीनेही एक जानेवारीपासून मोटारीच्या दरात २० हजार रुपयांनी वाढ करण्याच निर्णय घेतलाय. यात हुंद्याय मोटार इंडियाचाही समावेश करण्यात आलाय.
डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण होत असल्याने उत्पादनांच्या किंमती वाढवण्याशिवाय पर्याय नसल्याने हा निर्णय घेण्यात आला. सध्या मारुती कंपनी ऑल्टो ८०० ते एस क्रॉस पर्यंत सर्व वाहनांची विक्री करते. ज्यांची किंमत २.५३ लाख ते १३.७४ लाख रुपयांपर्यंत आहे.
बुधवारीच ह्युंदाय मोटार इंडियाने आपल्या वाहनांच्या किंमतीत पुढील महिन्यापासून ३० हजार रुपयांपर्यंत वाढीची घोषणा केली होती. टोयोटा, मर्सिडीज आणि बीएमडब्लू यांनी यापूर्वीच दरवाढीची घोषणा केलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.