नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्रातील भाजप आणि एनडीए प्रणित सरकारला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. २६ मे २०१४ या दिवशी या सरकारचा शपथविधी झाला होता. अनेक साहसी, परिवर्तनात्मक निर्णय हे या तीन वर्षांचे वैशिष्ट्य मानलं जातं आहे.
मोदी सरकारच्या तीन वर्षातील निर्णयात सगळ्यात धाडसी निर्णय म्हणजे नोटाबंदी. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठ्या बदलांचा सामना करावा लागला. 500 आणि हजार रुपयाच्या जुन्या नोटा बदलण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे देशात चलनतुटवडा निर्माण झाला होता. सरकारच्या या निर्णयामुळे देशवासियांना त्रासाला सामोरं जावं लागलं. मात्र काळा पैसा आणि भ्रष्टाचाराला आळा बसेल यामुळे देशवासियांनीही त्रास सोसूनही हा निर्णय स्वीकारला. याशिवाय जीएसटी आणि पाकिस्तानविरोधी सर्जिकल स्ट्राईकचा निर्णयही महत्त्वाचा ठरला.