राहुल गांधी दिल्लीत अखेर परतलेत

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी गेल्या ५६ दिवसांपासून अज्ञात वासात होते. राहुल गांधी कधी परत येणार, याकडे डोळे लावून बसलेल्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. 

Updated: Apr 16, 2015, 12:28 PM IST
राहुल गांधी दिल्लीत अखेर परतलेत

नवी दिल्ली : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी गेल्या ५६ दिवसांपासून अज्ञात वासात होते. राहुल गांधी कधी परत येणार, याकडे डोळे लावून बसलेल्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. 

राहुल गांधी गुरुवारी सकाळी नवी दिल्लीमध्ये परतले. सकाळी पावणे अकराच्या सुमारास खासगी विमानाने ते पालम विमानतळावर उतरल्याची माहिती  सूत्रांकडून देण्यात आली. दुपारी पावणेबाराच्या सुमारास राहुल गांधी तुघलक रस्त्यावरील त्यांच्या निवासस्थानी पोहोचले.

कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल यांची बहीण प्रियांका गांधी तुघलक रस्त्यावरील त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. भूमी अधिग्रहण विधेयकाविरोधात केंद्र सरकारवर दबाव आणण्यासाठी कॉंग्रेसकडून येत्या रविवारी नवी दिल्लीमध्ये शेतकरी मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी शुक्रवारी काही शेतकऱ्यांच्याही भेटी घेणार आहेत. 

मोदी सरकारने भूमी अधिग्रहण कायद्यात केलेल्या बदलांना कॉंग्रेसने पहिल्यापासून विरोध केला आहे. या विरोधाची धार आणखी तीव्र करण्यासाठीच शेतकरी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.