नवी दिल्ली : जुवेनाईल कायद्याबाबत वरिष्ठ वकिल राम जेठमलानी यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. जेठमलानी म्हणाले ही (निर्भया) एक छोटीशी घटना आहे. जी व्हायला नको होती. पण त्यामुळे प्रभावित होऊन जुवेनाईल कायद्यात कोणताही बदल होणे गरजेचे नाही आणि योग्य नाही.
जेठमलानी म्हणले मला नाही माहित की राज्यसभेत हे विधेयक पास होईल की नाही. पण माझ्यामते ते व्हायला नाही पाहिजे. काय फरक पडतो, निर्भया गँगरेप एक अनावश्यक घटना आहे. यामुळे विधेयकात कोणताही बदल व्हायला नको.
दुसरीकडे जेठमलानी यांनी असे वादग्रस्त विधान केले असताना राज्यसभेत या विधेयकावर चर्चा सुरू आहे. संसदेत सुरू असलेल्या जुवेनाईल कायद्यावर चर्चा व्हावी या मागणीसाठी निर्भयाचे आई-वडील राज्यसभेत पोहचले.