मुंबई : मुंबईच्या भाभा रिसर्च सेंटरच्या सुरक्षेबद्दल एक खळबळजनक आणि चिंताजनक गोष्ट समोर आलीय.
भाभा रिसर्च सेंटरच्या परिसराच्या वरच्या भागात एक ड्रोन पाहिला गेलाय. यावेळी या ड्रोनची उंची २० मीटरपर्यंत होती, असं सांगितलं जातंय. हा संशयास्पद ड्रोन जवळपास २५ मिनिटांपर्यंत आकाशात घिरट्या घालत होता. त्यानंतर हा ड्रोन त्या परिसरातून गायब झाला.
ड्रोन कॅमेऱ्यानं शुटींग करण्यात आल्याची तक्रार ट्राम्बे पोलिसांत दाखल करण्यात आलीय. काल दुपारी दीडच्या सुमारास देवनार डेपो समोर असणाऱ्या टाटा इन्सिट्युट ऑफ सोशल सेंटर गेट समोर एका टुरिस्ट कारमधून आलेल्या तीन जणांनी दोन द्रोण कॅमेरानी शुटींग केलंय. याप्रकरणी टाटा इन्स्टिट्युट ऑफ फंडामेंटल रिसर्चचे प्राध्यापक व्यंकट नागेश बाबू यांची चौकशी सुरू करण्यात आलीय
भाभा एटॉमिक रिसर्च सेंटर भारताचा पहिला न्यूक्लियर रिसर्च सेंटर आहे. या रिसर्च सेंटरचं उद्घाटन पंडित जवाहरलाल नेहरू यांनी २० जानेवारी १९५७ मध्ये केलं होतं. १२ जानेवारी १९६७ रोजी देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी या रिसर्च सेंटरचं नामकरण याचे संस्थापक होमी भाभा यांच्या नावावरून 'भाभा अॅटॉमिक रिसर्च सेंटर' असं केलं. होमी भाभा यांचा मृत्यू २४ जानेवारी १९६६ रोजी एका विमान अपघातात झाला होता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.