गोव्याहून अनिल पाटीलसह, दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई : गोव्यामध्ये सुभाष वेलिंगकरांच्या बंडामुळं भाजपच्या तंबूत घबराट पसरलीय. त्यातच शिवसेनेनं वेलिंगकरांच्या आघाडीशी युती करण्याची तयारी दर्शवलीय... त्यामुळं भाजपची डोकेदुखी आणखी वाढलीय.
सुभाष वेलिंगकरांच्या मेळाव्यातला हा संघस्वयंसेवकांचा निर्धार भाजपची चिंता वाढवणारा ठरलाय. 400 च्या आसपास स्वयंसेवक या मेळाव्याला उपस्थित राहतील, अशी अपेक्षा होती, पण हा आकडा दोन हजारांवर गेला. त्यामुळे वेलिंगकरांच्या अपेक्षाही वाढल्या आणि भाजपची डोकेदुखीसुद्धा....
भाजपला हरवण्यासाठी नरसिंह अवतार घ्या, असं आवाहन वेलिंगकरांनी या मेऴाव्यात केलं.
- गोव्यात साधारणपणे 20 ते 24 हजार मतदारांचा मतदारसंघ असतो.
- गोव्यात संघाच्या ४० शाखा आणि ४० शिशु वर्ग आणि साप्ताहिक मिलन आहेत. या माध्यमातून सुमारे दीड लाख कार्यकर्ते संघाशी जोडले आहेत.
- एकूण मतदारांपैकी हे प्रमाण 15 % आहे.
- सध्याच्या घडीला भाजपचे 21 आमदार आहेत.
- भाजपचे १० आमदार २००० पेक्षा कमी मताने जिंकून येतात.
- भाजपला हरवण्याचा चंग वेलिंगकरांनी बांधलाय.
- वेलिंगकर फॅक्टरचा फटका बसला तर आमदारांची ही संख्या चक्क
- एक आकडी होऊ शकते, असा अंदाज आहे.
गोव्यातल्या या राजकीय स्थितीचा उत्तम फायदा उचलला तो शिवसेनेनं .... शिवसेना खासदार संजय राऊत आणि सुभाष वेलिंगकर यांच्यात गोव्यामध्ये दीड तास खलबतं झाली.
- सध्या गोव्यात शिवसेनेची ताकद नाही.
- पण आगामी गोवा विधानसभा निवडणुकीत शिवसेना 20 जागा लढवणार आहे.
- शिवसेनेला महाराष्ट्राबाहेर पाळंमुळं मजबूत करायला, गोवा ही चांगली संधी आहे.
- बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे बरेचसे उमेदवार तिस-या क्रमांकावर राहिले होते. त्यांना लाखांहून जास्त मतं मिळाली होती
- त्यामुळे शिवसेनेचा उत्साह वाढलाय.
- वेलिंगकरांचा आणि शिवसेनेचा भाषिक अस्मितेचा मुद्दा हा समान धागा आहे.
त्यातच शिवसेना-भाजपचे संबंध सध्या ताणले गेलेत. त्यामुळे कुरघोडीची संधी शिवसेनेला सोडायची नाही.
गोव्यात मधला काही काळ वगळता 2002 पासून भाजप सत्तेत आहे. भाजपच्या याच सत्ताकारणाला वेलिंगकरांचा संताप भोवणार का? शांतादुर्गेच्या या भूमीत नेमका हिरण्यकश्यपू कोणाचा होणार, आणि नरसिंह अवतार म्हणून गोव्यात कोण उदयाला येणार, याची प्रचंड उत्सुकता आहे....