दिल्ली : एक युवती बाथरूममध्ये अंघोळ करत होती, झरोक्यातून एका तरूणाने या युवतीचा अंघोळ करतांना व्हिडीओ शूट केला. तेव्हा अचानक या युवतीच्या नजरेला युवकाचा हात आणि मोबाईल पडला. मोबाईल पाहून या युवतीने आरडा ओरडा केला, यानंतर या युवतीचे नातेवाईक आणि शेजाऱ्यांनी या युवकाला पकडलं आणि यथेच्छ धुलाई केली.
धुलाई केल्यानंतर या युवकाला पोलिसांकडे सोपवण्यात आलं, पोलिस या घटनेची चौकशी करत आहे, या युवकाचा मोबाईल ताब्यात घेण्यात आला आहे. बाथरूमच्या बाजूला असलेल्या पायऱ्यांवर चढून या युवक त्या युवतीच्या अंघोळीचा व्हिडीओ शूट करतांना रंगेहात पकडण्यात आला आहे.
या युवकाला येणारे-जाणारेही मार देत होते, मात्र त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर त्याचा मार थांबला. आरोपीचं नाव शादाब उर्फ शब्बू असल्याचं सांगण्यात येत आहे. पीडित युवती आपल्या नातेवाईकांसह दिल्ली पूर्वच्या सीलमपूर भागात राहते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शब्बू ब्रह्मपुरीचा राहणारा आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.