हा फोटो सोशल मीडियावर जबरदस्त होतोय व्हायरल

हल्लीच्या जगात प्रत्येक जण स्वार्थी झालाय. माणुसकी नावाची गोष्ट जगात शिल्लक राहील नाहीये, अस आजकाल ऐकायला मिळतं. वरील फोटो मात्र याला अपवाद आहे. 

Updated: Apr 26, 2016, 12:48 PM IST
हा फोटो सोशल मीडियावर जबरदस्त होतोय व्हायरल  title=

तबिलसी : हल्लीच्या जगात प्रत्येक जण स्वार्थी झालाय. माणुसकी नावाची गोष्ट जगात शिल्लक राहील नाहीये, अस आजकाल ऐकायला मिळतं. वरील फोटो मात्र याला अपवाद आहे. 

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात हा फोटो व्हायरल होतोय. हा फोटो पाहून कोणीही म्हणेल जगात माणुसकी अजूनही जिवंत आहे. अशीही माणसे आहेत जी स्वार्थापलीकडे जाऊन दुसऱ्यांचा विचार करतात. हा फोटो एका रेस्टॉरंटमधला आहे. जॉर्जियाच्या डॉग्लासव्हिले येथील एका रेस्टॉरंटमध्ये २२ वर्षीय अॅलेक्स रुईज वेटरचे काम करतो. मात्र कामाच्या पलीकडेही तो रेस्टॉरंटमधले आलेल्या लोकांना आपुलकीने मदत करतो. 

रविवारी रुईजच्या रेस्टॉरंटमध्ये एक व्यक्ती आला. तो दोन्ही हातांनी अपंग होता. हॉटेलमध्ये आल्यावर त्याने जेवणासाठी ऑर्डर दिली आणि मदतीसाठी तेथील लोकांना विचारणा केली. यावेळी रुईजने एका क्षणाचाही विलंब न करता त्या व्यक्तीला जेवणासाठी मदत केली. 

याचदरम्यान त्या हॉटेलमध्ये जेवत असलेल्या रेगिनाल्ड विड्नेर यांनी हा फोटो क्लिक केला आणि सोशल साईटवर अपलोड केला. रेस्टॉरंटमधील ते चित्र काळजाला भिडणारे असे होते. मी नेहमी या रेस्टॉरंटमध्ये येतो. रुईजला मी नेहमी रेस्टॉरंटमध्ये हसतमुखाने लोकांना मदत करताना पाहिलेय, अशी प्रतिक्रिया तो फोटो पोस्ट कऱणाऱ्या विड्नेर यांनी दिली.