पाक जवानांनी नाकरली 'बीएसएफ'नं दिलेली मिठाई

सीमेवर सीमारेषा ओलांडल्यावरून भारत-पाकमध्ये सुरु असलेल्या तणावादरम्यान आज बीएसएफ जवानांकडून मिठाई वाटली गेली. पण, पाकिस्तानी रेंजर्सनं मात्र ही मिठाई स्वीकारण्यास नकार दिलाय. 

Updated: Jul 18, 2015, 04:32 PM IST
पाक जवानांनी नाकरली 'बीएसएफ'नं दिलेली मिठाई  title=

अमृतसर/जम्मू : सीमेवर सीमारेषा ओलांडल्यावरून भारत-पाकमध्ये सुरु असलेल्या तणावादरम्यान आज बीएसएफ जवानांकडून मिठाई वाटली गेली. पण, पाकिस्तानी रेंजर्सनं मात्र ही मिठाई स्वीकारण्यास नकार दिलाय. 

दोन्ही देशांच्या सीमेवरील देखरेख दल जम्मूमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर तसंच पंजाबच्या अमृतसरमध्ये अटारी वाघा सीमेवर एकमेकांना मिठाई वाटतात. ही परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. 

अमृतसरचे सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) उपमहासंचालक एम एफ फारुकी यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटारी वाघा सीमेवर ईदच्या निमित्तानं भारतीय जवानांकडून मिठाई वाटली गेली परंतु, दुसऱ्या बाजुनं मात्र सकारात्मक प्रतिक्रिया मिळाली नाही. आम्ही प्रत्येक वर्षी ईदच्या निमित्तानं गोड पदार्थांची देवाण घेवाण करतो. आम्हाला सीमेवर शांती कायम ठेवायचीय, असं त्यांनी म्हटलंय. 

तर याउलट बीएसएफच्या एका वरिष्ठ कमांडरनं दिल्लीमध्ये आपल्या मुख्यालयात दिलेल्या माहितीनुसार, नियंत्रण रेषेवर संघर्ष विराम उल्लंघनाविरोधात भारतीय दलानं आंतरराष्ट्रीय सीमेवर रेंजर्सला ईदच्या निमित्तानं मिठाई दिली नाही. गेल्या काही दिवसांत पाककडून झालेल्या सीमा उल्लंघनात अनेक लोकांनी आपला जीव गमावलाय. तर अनेक जण जखमी आहेत. त्यामुळे यंदा मिठाई दिली गेली नाही.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.